Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री गेल्या 35 वर्षांत पाहिला नाही; भाजप नेत्याची सडकून टीका

Girish Mahajan Solapur Tour : उद्धव ठाकरेंचे अस्तित्व पणाला लागलेले आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले, त्यावेळीच त्यांचे आव्हान संपलेले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 July : उद्धव ठाकरेंचे हिंदी भाषेच्या सक्तीबाबत उलटे झाले. मी तर म्हणतो चोराच्या उलट्या बोंबा झाल्या आहेत. हिंदी सक्तीचे सर्व निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतले. समिती नेमली, रघुनाथ माशेलकर समितीने जो अहवाल दिला, तो कॅबिनेटमध्ये मान्य करण्यात आला. मात्र, आता म्हणत आहेत की, आम्ही ते होऊ देणार नाही मग त्यावेळी तुम्ही झोपले होते का? उद्धव ठाकरे काहीच पाहत नव्हते. अडीच वर्षांत ते महिनाभर देखील मंत्रालय किंवा विधानसभेत आले नाहीत, असा मुख्यमंत्री मी गेल्या 35 वर्षांत पहिल्यांदाच अनुभवला आहे. काही वाचत नाही, पाहत नाही. मग ब्लाईंडपणे सह्या केल्या का? असा सवाल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.

सोलापुरात माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे तुम्ही समिती नेमता, कॅबिनेटमध्ये मंजुरी देता आणि त्यावेळी हिंदी सक्तीची केली होती. याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या वेळी हा जीआर निघाला, तेव्हा त्यांनी ती हिंदी पर्यायी भाष केली होती.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी सक्ती करण्यात आला आहे का, यावर ते गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, हिंदी भाषिकांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला. त्यांनी हिंदी भाषा अनिवार्य केली होती. त्यांच्या सह्या असलेले रिपोर्ट आम्ही समोर ठेवलेले आहेत. मला वाटतं अतिशय बालिशपणाने त्यांचं वागणं सुरू आहे.

निवडणुका जवळ आहेत आणि त्याला आम्ही तयार आहोत. कोणाला कोठे जायचं, कोणाशी युती करायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमच्या तीनही पक्षावर लोकांचा विश्वास आहे. निवडणुका झाल्यानंतर कळेल की, कोण किती प्रभावी आहे, कोणाचा फायदा तोटा झाला आहे, असे महाजन यांनी स्पष्ट केले

Uddhav Thackeray
Assembly Session : सुधीरभाऊंच्या कोटीने जयंतराव, वडेट्टीवार, आव्हाड खळखळून हसले, म्हणाले, ‘आम्ही एवढं कर्ज करू की....’

उद्धव ठाकरेंचे अस्तित्व पणाला लागलेले आहेत. ज्यावेळी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले, त्यावेळीच त्यांचे आव्हान संपलेले आहे. क्षणिक सुखापुरती त्यांनी ती खुर्ची उपभोगली. गेल्या अडीच वर्षांत ते घरी गेले, पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय आहे. त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, क्षणिक सुखापुरतं तुम्ही पार्टीला वेठीस धरू नका. मात्र, त्यांनी तरीही चूक केली, बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आयडॉलॉजी बाजूला टाकले, असा आरोप महाजन यांनी केला.

शक्तिपीठ महामार्गाबाबतचा निर्णय सर्वांना विश्वासात घेऊन करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा निर्णय होईल. कोणत्याही शेतकऱ्यांवर बळजबरी होणार नाही. समृद्धी महामार्गावर देखील असेच प्रकार झाले होते, मात्र आता सर्व खुश आहेत.

Uddhav Thackeray
Nashik Politic's : मामा राजवडेंना शिवसेनेने का काढले?; गिरीश महाजनांनी सांगितली अंदर की बात!

रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करतोय, मग तुम्हाला काय पोटदुखी आहे? आम्ही एकट्याने आलो असतो तर म्हटले असते एकट्या आले. आमची एकी त्यांना बघवत नाही; म्हणून काहीतरी टीका करत आहेत. आमच्यात कुठेही चढाओढ नाही, उलट एकनाथ शिंदेंनी मला निरोप दिला की मी, जातोय तुम्ही या.

संजय राऊत सर्वात मोठे भविष्यवेत्ते आहेत. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील, असेही संजय राऊत मागे एकदा म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील करायला संजय राऊत मागेपुढे पाहणार नाहीत, असा टोलाही भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com