Nashik Politic's : मामा राजवडेंना शिवसेनेने का काढले?; गिरीश महाजनांनी सांगितली अंदर की बात!

Girish Mahajan Statement : मी 35 वर्षांपासून आमदार आहे. माझी एखादी गुंड टोळी सांगा, माझी एखादी खंडणीचे प्रकरण सांगा, वसुली याची एखादी तरी गोष्ट सांगा. त्यांनी चार्ट लवकर द्यावा. एकनाथ खडसे त्यांना मदत करणार होते.
Sanjay Raut-Girish Mahajan
Sanjay Raut-Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 July : संजय राऊत हे रोज सुधाकर बडगुजर यांच्या घरी जाऊन जेवणखान करायचे. त्या वेळी ते मान्य होतं. ते सोडून गेले की मग ते एकदम नालायक झाले. मामा राजवाडे यांना चार दिवसांपूर्वी अध्यक्ष केलं, त्यांनी आम्हाला (भाजप) विचारणा केल्यावर त्यांना काढून टाकण्यात आलं. नाशिकमध्ये महिनाभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीन अध्यक्ष बदलले, त्यामुळे त्यांची अवस्था खूप वाईट आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पार्टी बिना अध्यक्षांची ठेवावी, असा सल्ला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंना दिला.

गिरीश महाजन (Girish Mahajan) हे आज (ता. 04 जुलै) सोलापुरात आले हेाते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला खरपूस शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणाले, संजय राऊत यांच्यासोबत लोक असले की ते खूप चांगले असतात. तेच लोक त्यांच्याकडून आमच्याकडे आले की मग ते दाऊद, छोटा शकील होतात, त्यामुळे ते असे असंबंध बोलत असतात. संजय राऊत यांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा महापालिकेला निकाल दाखवावेत. महापालिकेचा निकाल लागल्यानंतर त्यांची संख्या किती येते, याचे आश्चर्य वाटेल. त्यांचे मागचे पुढचे सर्व रेकॉर्ड तुटतील.

जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल न बोललेलं बरं. ते काहीही बोलतात, त्यांच्या जिभेला हाड नाही. त्यांना काहीतरी वेगळं बोलून टीआरपी हवा असतो. हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.

सुनील बागुल, मामा राजवाडे यांच्याबाबत ते म्हणाले, आमच्याकडे येण्यासाठी सगळेच मागे लागले आहेत. आम्ही कोणाचे गुन्हे घेतो आणि गुन्हे दाखल करतो, हा आमचा उद्योग नाही. त्यांच्याकडून आमच्याकडे यायला लागले की काहीतरी आरोप करावे लागतात. ठाकरे गटाने आधी शिंदेंना काढले, त्यानंतर राजवाडे यांनाही काढले. महिनाभरात किती अध्यक्ष करणार आहात?

Sanjay Raut-Girish Mahajan
Dr. Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; आत्महत्येपूर्वी तीन दिवसांत डॉक्टरांनी एकाच व्यक्तीला 11 वेळा केला फोन

संजय राऊत यांनी ‘गिरीश महाजन गुंड टोळी चालवतात’ या आरोपावर महाजन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मी 35 वर्षांपासून आमदार आहे. माझी एखादी गुंड टोळी सांगा, माझी एखादी खंडणीचे प्रकरण सांगा, वसुली याची एखादी तरी गोष्ट सांगा. त्यांनी चार्ट लवकर द्यावा. एकनाथ खडसे त्यांना मदत करणार होते. बाष्कळ बडबड करू नका, पुराव्यानिशी काहीतरी बोला. माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, असं बोलण्यात काही अर्थ नाही. खडसेंनीही अशीच बाष्कळ बडबड केली होती. माझ्याकडे सीडी आहे, उगीच मोबाईल काढतात, कुठेतरी होती असं सांगतात. (एकनाथ खडसे यांची मिमिक्री करत टीका) हा काय प्रकार आहे, हवेत गोळीबार करायची, बाष्कळ बडबड करायची हा त्यांचा उद्योगच आहे.

Sanjay Raut-Girish Mahajan
Ajit Pawar Demand: अजित पवार वाढवणार भाजपची डोकेदुखी, उत्तर महाराष्ट्र सर्वाधिक जागांची मागणीच्या हालचाली!

मनीषा कायंदेंनी कोणत्या आधारावर आरोप केला, हे मला माहिती नाही

आषाढी पालखी सोहळ्यात नक्षलवादी घुसले, या मनीषा कायंदे यांनी केलेल्या आरोपावरही गिरीश महाजन यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मनीषा कायंदे यांनी आरोप केला आहे, त्याबाबत सरकार निश्चित काळजी घेत आहे. आमचे पोलिस तपासणी करून त्याबाबत काळजी घेत आहेत. मात्र, मला असं काही झालंय, असं वाटत नाही. मात्र, काही सांगता येत नाही. आजकाल कोण कोणत्या थराला जाईल, हे सांगता येत नाही. मात्र सरकार अलर्ट आहे. ताईंनी कोणत्या आधारावर आरोप केला आहे, हे मला माहिती नाही. पण, त्यांनी शंका व्यक्त केले आहे, त्याबाबत तपास होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com