Maharashtra Politics: ‘भाजपच्या विरोधासाठी आम्ही काँग्रेसचे विष पचवू; पण महाविकास आघाडीसोबतच राहू...’

Former MLA Narsayya Adam Master's Announcement : सोलापूर शहरालगत असलेल्या कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रे नगर येथे येत्या 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्यस्तरीय राजकीय अभ्यास शिबिराचे आयोजन केले आहे.
Narsayya  Adam Master
Narsayya Adam MasterSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 August : लोकसभा निवडणुकीत मदत करूनही विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्यास कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाला विरोध दर्शविण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा काँग्रेसचे विष पचवू आणि महाविकास आघाडीसोबत युती करूनच महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्यात येईल, अशी वेदनादायी भूमिका माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी मांडली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवांचे राज्यस्तरीय शिबिर उद्यापासून (ता. 22 ऑगस्ट) रविवारपर्यंत (ता. 24 ऑगस्ट) आयोजीत करण्यात आले आहे. पक्षाच्या सचिवांना मार्गदर्शन करण्यासाठी होणारे हे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रे नगर परिसरात होणार आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam Master) यांनी ही माहिती दिली.

माजी आमदार आडम मास्तर यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीसंदर्भातही माहिती दिली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसच्या (Congress) उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यांचा प्रचार आमच्या कार्यकर्त्यांनी केला. आम्ही त्यांच्यासाठी सभा घेतल्या. त्याबदल्यात विधानसभा निवडणुकीत आम्ही सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची मागणी केली होती.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी आम्हाला विधानसभेचा एक मतदारसंघ सोडण्याबाबत शब्द दिला होता. पण प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तो शब्द पाळला नाही. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा अनुभव अत्यंत वाईट आहे. त्यामुळे माकपचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षावर नाराज आहेत, असेही आडम यांनी स्पष्ट केले.

Narsayya  Adam Master
BEST Election Result : अंगावरचा गुलाल निघण्याआधीच बेस्ट कर्मचाऱ्यांना धक्का? शशांक राव तर ‘स्टार प्रचारक’…

माजी आमदार नरसय्या आडम म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत आघाडी करू नये, अशीच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण, सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत संकटाची आहे. भारतीय जनता पक्षाला सध्या विरोध करणे गरजेचे आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आलेल्या कटू अनुभवाचे विष पचवून महापालिका निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू.

Narsayya  Adam Master
Simhastha Kumbh mela : नगरविकास विभागाच्या अडून शिंदेंची कुंभमेळ्यात एंट्री; गिरीश महाजनांची अस्वस्थता वाढणार?

एमआयएम पक्षाला आमचा विरोध नाही. पण, आम्ही (माकप) ज्या प्रभागात उमेदवार देणार आहोत, त्याठिकाणी एमआयएमने दावा करू नये, अशीच आमची भूमिका राहणार आहे. तसेच, आम आदमी पक्ष आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेलाही सोबत घेण्याची आमची भूमिका असणार आहे, असेही माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com