Baliram Sathe : यापुढे पवारांशी आपला संबंध असणार नाही; माजी आमदार मानेंनी माझे राजकारण संपवण्याचा विडा उचललाय : बळीराम साठे

Solapur NCP SP NEWS : पाच महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी दिलेला शब्द पाळला गेला नाही, या कारणावरून माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पक्षाला रामराम केला. साठे गट स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे.
Baliram Sathe
Baliram SatheSarkarnama
Published on
Updated on
  1. पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तोडगा न निघाल्याने माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी शरद पवार पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुढील निवडणुका “साठे गट” म्हणून लढवण्याचा निर्धार केला.

  2. मोहिते पाटील यांनी आपल्याविरोधात षड्यंत्र रचल्याचा आरोप साठे यांनी केला, तसेच माजी आमदार यशवंत माने यांच्यावरही कार्यकर्त्यांना फोडण्याचा आरोप केला.

  3. उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी राजीनामे देऊन अपक्ष म्हणून निवडणुका लढवतील, असे साठे यांनी जाहीर केले.

Solapur, 12 October (दयानंद कुंभार) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाच महिन्यांपूर्वी शब्द देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पुनर्वसन होत नसल्याचे पाहून माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी पक्षाला रामराम करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेतला. यापुढे शरद पवार आणि आपला संपर्क असणार नाही, असे साठे यांनी निक्षून सांगितले. मात्र, कुठल्या पक्षात जायचं हा निर्णय तूर्तास स्थगित ठेवून आगामी निवडणुका ह्या साठे गट म्हणून लढविण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदारून उचलबांगडी करत त्या ठिकाणी मोहिते पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांची वर्णी लावण्यात आली होती. तेव्हापासून साठे हे नाराज होते. मात्र, पवारांनी त्यांची समजूत काढून सोलापूर जिल्ह्यासाठी दोन अध्यक्ष नेमण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्याला पाच महिने होऊनही निर्णय होत नसल्याने बळीराम साठे (Baliram Sathe) यांनी परवा पक्ष सोडण्याची घोषण केली होती.

साठे म्हणाले, खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. त्यांच्या साथीला आमदार अभिजीत पाटीलही आहेत. मला पक्षापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा होऊनही कुठलाही तोडगा निघाला नाही. मला डावलून तालुकाध्यक्षांच्या परस्पर निवडी करण्यात आल्या. त्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

उत्तर सोलापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी राजीनामे देऊन जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक अपक्ष म्हणून लढण्यात येतील. कोणत्या पक्षात जायचं, हा निर्णय तुर्तास स्थगित ठेवण्यात येत आहे. निवडणुकीनंतर त्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही साठे यांनी स्पष्ट केले.

माझं राजकारण संपवण्याचा विडा माजी आमदार यशवंत माने यांनी उचलला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना आमिष दाखवून फोडण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही बळीराम साठे यांनी माजी आमदार माने यांच्यावर केला.

बळीराम साठे यांना साथ देणार : आमदार राजू खरे

मोहिते पाटलांकडून बळीराम साठे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, तीन माजी आमदार एकत्र येऊन काकांचे राजकारण संपण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मी साठे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत प्रचारात पायाला भिंगरी लावून उतरणार आहे. तन-मन-धनाने त्यांना साथ देणार आहे, असे आमदार राजू खरे यांनी सांगितले.

माझ्या आयुष्यातील शेवटची निवडणूक

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कुणाशीही तडजोड न करता निष्ठेने काम करावे. आपली ताकद दाखवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, ही माझ्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे, असे भावनिक उद॒गारही बळीराम साठे यांनी या वेळी काढले.

प्रश्न 1 : बळीराम साठे यांनी पक्ष का सोडला?
शरद पवारांनी दिलेल्या आश्वासनानंतरही पुनर्वसन न झाल्याने व अन्य नेत्यांच्या षड्यंत्रामुळे.

प्रश्न 2 : साठे कोणत्या पक्षात जाणार आहेत?
अद्याप निर्णय घेतलेला नाही; निवडणुकीनंतर ठरवले जाईल.

प्रश्न 3 : साठे यांना कोणाचा पाठिंबा आहे?
आमदार राजू खरे यांनी त्यांना तन-मन-धनाने साथ देण्याची घोषणा केली.

प्रश्न 4 : साठे यांनी आगामी निवडणुकीबाबत काय म्हटले?
“ही माझ्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे,” असे भावनिक विधान करत कार्यकर्त्यांना निष्ठेने काम करण्याचे आवाहन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com