Dhairyasheel Mohite Patil : केंद्रीय मंत्र्यांची खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना मोठी भेट; सर्वाधिक लाभ जयकुमार गोरेंच्या माणला!

Post offices News : खासदार मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात 79 नवीन पोस्ट कार्यालये सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय संचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.
 Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur 05 September : माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना केंद्र सरकारकडून गिफ्ट मिळाले आहे. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात तब्बल 13 नवीन पोस्ट कार्यालयास मंजुरी दिली आहे. त्याचा फायदा सर्वसामन्यांना होणार आहे. या पोस्ट कार्यालयामुळे बँकिंग सेवा, पत्र व्यवहार, आधार लिंकिंग, विमा योजना आणि इतर टपाल सुविधा गावात किंवा जवळच्या गावात उपलब्ध होणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात मंजूर झालेल्या तेरा नवीन पोस्ट कार्यालयांपैकी सर्वाधिक कार्यालये राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माण तालुक्यात असणार आहेत. याबाबतची माहिती खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी दिली आहे.

खासदार मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात ७९ नवीन पोस्ट कार्यालये सुरू करण्यासंदर्भात केंद्रीय संचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांच्याकडे मागणी केली होती. त्यापैकी मतदारसंघातील सहा तालुक्यांतील १३ पोस्ट कार्यालयास मंजुरी देण्यात आली आहे. ही सर्व पोस्ट कार्यालये येत्या ३१ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत सुरू होणार आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजना या पोस्ट कार्यालयात सहजपणे उपलब्ध होणार आहेत. केंद्राच्या विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी या कार्यालयाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा, पत्र व्यवहार, आधार लिंकिंग, विमा योजना व इतर टपाल सुविधा गावाजवळच उपलब्ध होणार आहेत.

 Dhairyasheel Mohite Patil
BJP Politic's : विधानसभेला आयात केलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजपने बनविले किसान मोर्चाचे अध्यक्ष

याबाबत मोहिते पाटील यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन मतदारसंघात नवीन पोस्ट कार्यालये सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती. त्या मागणीला यश आले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात १३ नवीन पोस्ट कार्यालये सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब ठरणार आहे. नवीन पोस्ट मंजूर केल्याबद्दल मी केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असेही मोहिते पाटील यांनी नमूद केले आहे.

 Dhairyasheel Mohite Patil
Onion Farmers Politics: ‘नाफेड’चा कांदा बाजारात, संतप्त राजू शेट्टी म्हणाले, ‘सरकारने कांदा दलाली करू नये’

माढा लोकसभा मतदारसंघात मंजूर झालेली तालुकानिहाय पोस्ट कार्यालये व गावे

सांगोला : वाणी चिंचोली, सोनलवाडी

करमाळा : हिवरे, आळजापूर

माढा : गवळेवाडी

माळशिरस : मारकडवाडी

पंढरपूर : पिराची कुरोली, करोळे

माण : कारखेल, हिंगणी, जांभूळनी, ढाकणी व सोकासन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com