Narayan Patil : विरोधकांच्या बालेकिल्ल्यात जाऊन नारायण पाटलांचा गर्भित इशारा; म्हणाले, ‘त्यांना सुटी देणार नाही...’

Karmala Political News : करमाळा मतदारसंघाला माढा तालुक्यातील 36 गावे जोडलेली आहेत. त्यातील रोपळे (ता. माढा) येथे नवनिर्वाचित आमदार नारायण पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Narayan Patil
Narayan PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 February : विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नारायण पाटील हे निवडून आले आहेत. पाटील यांनी अपक्ष आमदार संजय शिंदे यांचा पराभव करून पुन्हा एकदा करमाळ्याची आमदारकी मिळविली आहे. सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे, तर आमदार पाटील हे विरोधात आहेत. मात्र, विकासाच्या आड येणाऱ्यांना आम्ही सुटी देणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांच्या बालेकिल्ल्यात जाऊन दिला आहे. मात्र, नारायणआबांचा रोख नेमका कोणाकडे याची चर्चा करमाळ्याच्या राजकारणात रंगली आहे.

करमाळा (Karmala) मतदारसंघाला माढा तालुक्यातील 36 गावे जोडलेली आहेत. त्यातील रोपळे (ता. माढा) येथे नवनिर्वाचित आमदार नारायण पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना नारायण पाटील यांनी विकास कामांच्या आड येणाऱ्यांना आपण सोडणार नसल्याचा इशारा विरोधकांच्या बालेकिल्ल्यात जाऊन दिला आहे.

सर्वसामान्यांच्या सुखदुःखात काम करणारा, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा आणि त्यांना खंबीरपणे साथ देणारा मी कार्यकर्ता आहे. विकास कामांच्या आड कोणीही आलं तर त्याला आम्ही सुटीही देणार नाही. हे तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, असेही आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी म्हटले आहे.

Narayan Patil
Mohol Politic's : मोहोळचं राजकारण पुन्हा पेटलं; उमेश पाटलांचा अजिंक्यराणा पाटलांवर पलटवार, म्हणाले, ‘बैलगाडीखाली कुत्रं नव्हे...’

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नारायण पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात तत्कालीन आमदार संजय शिंदे हे होते. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऐवजी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. नारायण पाटील हे तब्बल 16 हजार मतांनी निवडून आले आहेत.

Narayan Patil
Sandeep Kshirsagar : बीडमध्ये आणखी एक ट्विस्ट; संतोष देशमुख खूनप्रकरणी आक्रमक भूमिका घेणाऱ्या संदीप क्षीरसागरांनी घेतली अजितदादांची भेट (Video)

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी मतदारसंघाच्या विकासासाठी निधी खेचून आणण्यात येईल. सर्वसामान्यांची कामे कुठेही अडू दिली जाणार नाहीत. विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी सरकारशी भांडून निधी आणू, असा शब्दही आमदार नारायण पाटील यांनी करमाळा आणि माढ्यातील जनतेला दिला आहे. मात्र, विरोधकांच्या बोलकिल्ल्यात जाऊन आमदार पाटील यांनी दिलेला हा इशारा विशेष मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com