

Balasaheb Thorat News: नाशिक विधान परिषद मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले नाही. काही ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतली. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर सहकाऱ्यांनीच टीका केली होती.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मात्र नाशिक मतदारसंघातील माघारीचे समर्थन केले आहे. महाविकास आघाडी नेत्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय झाला. त्यामुळे तो निश्चित रणनीतीचा एक भाग असल्याचे संकेत त्यांनी दिले.
पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे महायुतीचा अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी 'मतांची बेरीज नसेल तर लढायचे कशाला?'असे विधान केले होते.
या विधानावर काँग्रेस नेते थोरात यांनी मात्र वेगळे मत मांडले आहे. ते म्हणाले, माघारी नंतर नाराजीचे नाट्य सुरू आहे. पहिला न शोभणाऱ्या मार्गांचा अवलंब करून भाजपने अनेकांना माघार घेण्यात भाग पाडले. आमच्यातीलच असेही काही जण आहेत ज्यांनी मतांची बेरीज नसेल तर लढायचे कशाला अशी भूमिका घेतली.
खासदार सुळे यांच्या विधानावर थोरात यांनी अप्रत्यक्षरीत्या टीका केल्याचे बोलले जात आहे. मात्र, नाशिकच्या जागेबाबत विधान परिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद किंवा विसंवाद नाही. झालेले निर्णय निश्चित रणनीतीचा भाग असल्याचा अप्रत्यक्ष संकेत त्यांनी दिला.
विधान परिषद निवडणुकीबाबत महायुतीतच गोंधळ आहे. कोणाला पाठिंबा द्यायचं याबाबत त्यांच्यातच एकमत नाही. महायुतीतील नेत्यांनी जाहीरपणे त्याबाबत मतप्रदर्शन केले आहे, याकडे थोरात यांनी लक्ष वेधले. मात्र यावरून पुणे आणि नाशिक मतदारसंघातील माघारीवरील महाविकास आघाडीतील नेत्यांतील भिन्न मतप्रवाह पुढे आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.