Prashant Kortkar: प्रशांत कोरटकर मुंबईत की दुबईत? शिवरायांच्या अवमानप्रकरणी नवा ट्विस्ट; इंद्रजीत सावंतांचे सरकारवर गंभीर आरोप

Prashant Kortkar: पोलीस यंत्रणेकडून या प्रकरणात कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळं कोरटकर मुंबईत आहे की दुबईत आहे? असा सवालही नोटीशीत सावंतांनी विचारला आहे.
Prashant Koratkar
Prashant KoratkarSarkarnama
Published on
Updated on

Prashant Kortkar Issue: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक भाषा वापरणारा प्रशांत कोरटकर याच्यावर गेल्या एक वर्षापासून चार्जशीट दाखल झालेली नाही. पोलीस यंत्रणेकडून या प्रकरणात कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळं कोरटकर मुंबईत आहे की दुबईत आहे? असा सवाल करत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नव्हे तर सावंत यांनीच खुद्द पोलिसांनी यासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Prashant Koratkar
Shweta Singh: "श्वेता सिंह DGCAत बसून मोठं रॅकेट चालवतात"; रोहित पवारांनी आरोप केलेली महिला कोण? महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबाशी आहे कनेक्शन

नेमकं प्रकरण काय?

नागपूर येथील पत्रकार आणि वर्ध्याच्या हिंगणघाट येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रशांत कोरटकर यानं वर्षभरापूर्वी इंद्रजीत सावंत यांना फोन करुन जीवेमारण्याची धमकी देत शिवीगाळही केली होती. यावेळी बोलताना त्यानं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर कोरटकरविरोधात सावंत यांनी पोलिसांत तक्रार दिली होती त्यावरुन त्याच्यावर १ मार्च २०२५ रोजी गुन्हा देखील झाला होता. त्यानंतर महिनाभर कोरटकर फरार झाला होता. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये तेलंगणातून त्याला अटक करण्यात आली होती. कोल्हापूर कोर्टानं त्याला न्यायालयीन कोठडीही सुनावली होती. पण नंतर हायकोर्टानं त्याला जामीन मंजूर केला ही केस अद्यापही सुरुच आहे.

Prashant Koratkar
Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील ७ जागांसह देशभरातील ३७ राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर; 'हे' फायर ब्रँड खासदार पुन्हा येणार का?

वर्षभरानतंरही चर्जशीट का नाही?

पण या वर्षभराच्या काळात पोलिसांनी त्याच्याविरोधात अद्याप चार्जशीट दाखल केलेली नाही. त्यामुळं कोरटकरला राज्य शासनानं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभय दिलं असल्याचा गंभीर आरोप इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. त्यामुळं कोरटकर देशातच आहे की देशाबाहेर पळून गेला आहे असा सवालही सावंत यांनी केला आहे. या संदर्भात अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रिया आवले, अॅड. योगेश सावंत, अॅड. हेमा काटकर, अॅड. सकलेन यांच्यासह इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी पोलीस प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावत तपास अद्याप पूर्ण का नाही झाला? विचारणा केली आहे. तसंच प्रशांत कोरटकर हा भाजप नेते आणि मूलतत्त्ववादी शक्तींच्या जवळचा असल्यानं त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Prashant Koratkar
Video: फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांचा मुंबईत फिटनेस मंत्र! परदेश दौऱ्यातही नियमांशी तडजोड नाही; मुंबईकरांची जिंकली मनं

देशाबाहेर पळाला का?

प्रशांत कोरटकरला जेव्हा हायकोर्टानं जामीन मंजूर केला तेव्हा त्याला अटीशर्ती घातल्या होत्या. या अटींचं तो पालन करतो आहे की नाही? तो सध्या महाराष्ट्रातच आहे की दुबईला पळून गेला आहे? असा सवालही इंद्रजीत सावंत यांनी नोटीशीद्वारे विचारला आहे. या नोटिशीला पोलिसांनी पुढील ७ दिवसांच्या आत उत्तर द्यावं, अन्यथा आम्हाला नाईलाजनं कोर्टात जावं लागेल आणि न्याय तसंच प्रलंबित न्याय प्रक्रिया शाबूत राहावी यासाठी आवाज उठवावा लागेल असंही या पत्रात म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com