
Solapur, 02 May : सोलापूरमधील प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. डॉक्टराच्या आत्महत्येचे गूढ अजूनही कायम आहे. डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिस चौकशीतही त्याची उत्तरे अद्याप मिळालेले नाहीत. डॉक्टरांना त्यांच्याच दवाखान्यात उपचारासाठी नेल्यावर उपचारावेळी अंगावरील कपडे रक्ताने माखले होते आणि त्यावेळी कपडे फाडून काढले होते, तरीही शवविच्छेदनावेळी कपडे फाडले आणि त्यांच्या झडतीत चिठ्ठी सापडल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आलेला आहे? विशेष म्हणजे पोलिस आयुक्तांनी सुसाईड नोट सापडली नसल्याचे सांगितले होते, त्यामुळे सुसाईड नोट नेमकी नेमकी सापडली कुठे? तसाच संशय पिस्तूलबाबत आहे, त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. पोलिस त्यावर काहीही बोलताना दिसून येत नाहीत.
डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांच्या आत्महत्या प्रकरणात हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आलेली आहे. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही, त्यामुळे पोलिसांनीच मनीषा मुसळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे. मुसळे माने हिच्या वकिलांनी तिच्यावरील आरोप फेटाळून लावत जामीनासाठी अर्ज केला आहे. तिच्या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे (suicide Case) अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पाेलिस चौकशीही त्याची अद्याप उत्तरे मिळालेली नाहीत. डॉक्टरांनी बाथरूमध्ये स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या होता, डॉ. वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मात्र, ही पिस्तूल बाथरूमध्ये सापडण्याच्या ऐवजी ती बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये सापडली होती. त्यामुळे ती पिस्तूल नेमकी कपाटाच्या ड्राव्हर नेमकी आणून ठेवली. त्यावरच कोणाचे ठसे उमटले आहेत, याचा अहवाल अजूनही आलेला नाही.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरांना त्यांच्याच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्या वेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपडे रक्तांनी माखले होते. त्यामुळे ते कपडे फाडून उपचार करावे लागले होते. पण फिर्याद उल्लेख नेमका उलटा आहे. शवविच्छदनावेळी कपडे फाडले आणि त्या वेळी घेतलेल्या झडतीत चिठ्ठी सापडल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे ससाईट नोटबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण ही एक हायप्रोफायल केस आहे, त्यामुळे आरोपी मनीषा मुसळे माने हिने केलेल्या घाणेरड्या आरोपांचा शोध घ्यायचा असल्याचे तपास अधिकाऱ्यांनीच न्यायालयासमोर सांगितले होते. पण, मनीषा मुसळे माने हिची पोलिस कोठडी संपली तरी घाणेरडे आरोप नेमके कोणते? हेही समोर आलेले नाही.
मनीषाने केलेले घाणेरडे आरोप कोणते?
शवविच्छेदनावेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपडे फाडून ते पोलिसांकडे देण्यात आले होते. त्या वेळी डॉक्टरांच्या पॅन्टच्या डाव्या खिशात चिठ्ठी मिळाली. त्यात मी ‘ज्या माणसाला शिकवून आज ‘एओ’ (प्रशासकीय अधिकरी) केले आणि चांगला पगार देतो आहे, त्याने खोटारडे व घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. त्याचे मला अतीव दु:ख झाले आहे, म्हणून मी माझे जीवन संपवत आहे,’ असे लिहून त्याखाली शिरीष असे लिहिले आहे. त्या मजकुरात ‘एओ’ शब्दाच्या वर मुसळे असे नमूद केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. आता डॉक्टरांनी मनीषाला काय शिकवले होते, मनीषा यांनी कोणते घाणेरडे आरोप केले होते, या बाबी तपास झालेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.