Solapur News : डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येचा उलगडा होण्याआधीच सोलापुरात आणखी एका डॉक्टराची आत्महत्या

Crime News : एकीकडे डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्यामुळे खळबळ उडालेल्या वैद्यकीय क्षेत्रातून आज पुन्हा एकदा डॉक्टर असलेल्या नवतरुणाने आत्महत्या केली आहे.
Dr. Aditya Nambiar
Dr. Aditya NambiarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 April : प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या होऊन बारा दिवस होत नाही, तोच सोलापुरात आणखी एका डॉक्टराने आत्महत्या केली आहे. अवघ्या दहा ते बारा दिवसांच्या अंतरात दोन डॉक्टरांनी आत्महत्या केल्याने सोलापूर वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

आदित्य नमबियार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे (Doctor) नाव आहे. डॉ. आदित्य नमबियार यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. मात्र लागोपाठ दोन डॉक्टरांच्या आत्महत्या झाल्याने सोलापूरमध्ये एकच चर्चा रंगली आहे.

आदित्य नमबियार गळा कापून घेत आत्महत्या केली आहे. त्यांनी ही आत्महत्या राहत्या खोलीत केली आहे. नमबियार हा सोलापूरमध्ये (Solapur)भाड्याने राहात होता. डॉ. आदित्य नमबियार याचे नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Dr. Aditya Nambiar
Madha News : आमसभेत गंभीर आरोप झालेल्या माढ्याच्या तहसीलदारावर अखेर निलंबनाची कारवाई

आदित्य नमबियार याचे वैद्यकीय शिक्षण सोलापूरमधील डॉ. वैशंपयान स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात झाले आहे. नमबियार याने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नुकतेच शिकाऊ डॉक्टर म्हणून सेवेला सुरुवात केली होती. मात्र, नमबियार याने आयुष्याला सुरुवात होण्याआधीच शेवट करून घेतला आहे.

नमबियार हा भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याच खोलीत त्याने गळा कापून घेत आत्महत्या केली आहे. शिकाऊ डॉक्टर असलेल्या आदित्य याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नमबियार याचा मृतदेह शवविच्छादनासाठी सोलापूरच्या सीव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आलेला आहे.

Dr. Aditya Nambiar
Vijaykumar Deshmukh : बाहेरून आलेले भाजपहिताचा काय निर्णय करणार? विजयकुमार देशमुखांचा निशाणा कोणावर?

एकीकडे डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्यामुळे खळबळ उडालेल्या वैद्यकीय क्षेत्रातून आज पुन्हा एकदा डॉक्टर असलेल्या नवतरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचा वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com