Solapur Airport : सोलापूरची विमानसेवा कुठे रखडली, पहिले उड्डाण गोवा की मुंबईला?, पालकमंत्र्यांनी सांगितली अंदर की बात!

Jaykumar Gore Statement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस यांनी स्टार एअर लाईन्सशी चर्चा केली आणि थांबविण्यासाठी विनंती केली. पण आमची आता फ्लाय 91 या कंपनीशी चर्चा सुरू आहे, त्यामुळे सोलापुरातून लवकरच विमान उड्डाणाची बातमी कळेल.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 25 April : विमानसेवेच्या अनुषंगाने आम्ही सोलापूरकरांना गोड बातमी दिलेली आहे. सोलापूरला विमान उड्डाणाची परवानगी मिळालेली आहे. फ्लाय 91 ही कंपनी विमानसेवेला तयार आहे. मात्र, कंपनीचे म्हणणे आहे की, पाहिले उड्डाण गोव्याला करू, तर आमचे म्हणणे आहे की, ते मुंबईला करावे. त्याबाबत आमची त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे, ते अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे विमान उड्डाणाची गोड बातमी लवकरच कळेल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा एकदा सांगितले.

शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी पत्रकार परिषद घेतली. तीत बोलताना गोरे यांनी सोलापूरच्या विमानसेवेबाबत भाष्य केले. ते म्हणाले, स्टार एअर कंपनीला उड्डाणाची परवानगी मिळाली होती. पण ती विमानतळच्या क्षमतेची नव्हती. त्यांची परवानगी घेण्यासाठी थांबलो असतो, तर आणखी एखादे वर्षे गेले असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस यांनी स्टार एअर लाईन्सशी चर्चा केली आणि थांबविण्यासाठी विनंती केली. पण आमची आता फ्लाय 91 या कंपनीशी चर्चा सुरू आहे, त्यामुळे सोलापुरातून लवकरच विमान उड्डाणाची बातमी कळेल.

उजनी (Ujani Dam) जल पर्यटन प्रकल्पाबाबत गोरे म्हणाले, मी वारंवार सांगितलं आहे की, उजनी जल पर्यटन प्रकल्प अहिल्यानगरला नेऊ देणार नाही. जमीन त्यांची आहे, खाते त्यांचे आहे. त्या खात्याला नवीन मंत्री आलेले आहेत. मंत्र्यांनी स्वतःचा आराखडा तयार केला आहे. पर्यटनाची योजना आखली आहे. जलसंपदा खात्यातर्फे त्याचा विकास व्हावा, ही त्यांची भावना आहे. जलसंपदा खाते आणि महामंडळ यासाठी सक्षम आहे. त्यांनी जो आराखडा केलेला आहे, त्यापेक्षा उत्तम प्रकारचा आराखडा आम्ही करू आणि सेव्हन स्टार पद्धतीचे पर्यटन स्थळ उभारु.

Jaykumar Gore
Pakistani citizen In Solapur : सोलापूरमध्ये 25 पाकिस्तानी नागरिक; पण ते सिंधी-हिंदू : पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती

टंचाई आराखड्याबाबत गोरे म्हणाले, दुष्काळासंदर्भात जिल्हाधिकारी, सीईओ, बीडीओ ग्रामसेवकांपासून सर्वांना सक्त सूचना दिल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी पाण्याची गरज आवश्यकता आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याची गरज आहे, त्या त्या ठिकाणी पाणी टँकर आणि इतर पर्यायाबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात कुठेही पाणी कमी पडू दिले जाणार नाही. ज्या ठिकाणची प्रस्ताव येतील तेथे दोन दिवसांत टॅंकर पुरवला जाईल.

देवेंद्र फडणवीस हे 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्यावर गोरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे माझे नेते, मुख्यमंत्री आणि भाजप नेते आहेत. भाजपची सत्ता अविरत राहावी, ही माझी मनापासूनची इच्छा आहे. मुख्यमंत्री फडणवीसच राहिले पाहिजेत, यात काहीच शंका नाही. एवढा सक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालाय, त्यामुळे 2034 च काय, त्यापुढे असले तरीही हरकत नाही.

Jaykumar Gore
Jaykumar Gore : जयकुमार गोरे हे सर्वांत चतूर मंत्री; ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेंनी काढला चिमटा

नरेश म्हस्के यांनी काय विधान केले, याबद्दल मला माहिती नाही. मात्र तसे बोलणे योग्य नाही. संकटाच्या क्षणात जसे त्यांना आणावे लागेल त्यासाठी त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com