Jaykumar Gore: जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मोठी अपडेट! तक्रारदार महिला पुण्यातील निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या संपर्कात ?

Jaykumar Gore Extortion Case Upate : काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांना दोन कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी एका महिलेला रंगेहात पकडण्यात आलं होतं. ही महिला माजी आयएस अधिकारी यांच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
Victim And Jaykumar Gore
Victim And Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरणामध्ये गुरुवारी (ता.3 एप्रिल) नवी मोठी अपडेट समोर आली आहे. खंडणीच्या प्रकरणात निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातील घरी जात तब्बल सातारा पोलिसांनी तीन तास चौकशी केली असल्याचं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांना दोन कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी एका महिलेला रंगेहात पकडण्यात आलं होतं. ही महिला माजी आयएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

त्यामुळे प्रभाकर देशमुख यांच्या चौकशीसाठी सातारा पोलीस त्यांच्या कोरेगाव पार्क येथील घरी आज सकाळी दाखल झाले होते.सकाळपासूनच सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्या घरी चौकशीसाठी ठाण मांडून होते. मात्र यावेळी प्रभाकर देशमुख हे घरी नसल्याचं समोर आलं आहे.

Victim And Jaykumar Gore
BJP Vs Uddhav Thackeray : अमित शाहांंवर केलेली टीका झोंबली; भाजप म्हणतं, ठाकरे संभ्रमात,एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीत...

⁠महिलेनं मंत्री गोरे यांना मागितलेली खंडणी तसेच पत्रकार तुषार खरात प्रकरणात सातारा पोलिसांना प्रभाकर देशमुख यांच्याकडे चौकशी करायची असल्याचं समोर आलं आहे . मात्र, प्रभाकर देशमुख घरी नसल्यानं पोलिसांनी (Police) त्यांच्या कुटुंबाकडे चौकशी केली. तसेच प्रभाकर देशमुख यांच्या ड्रायव्हरला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस साताऱ्याकडे रवाना झाले आहेत.

Victim And Jaykumar Gore
Supreme Court Justice : मोठी बातमी: सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसह सर्वच न्यायमूर्तींनी उचललं मोठं पाऊल; संपत्ती...

दरम्यान, ⁠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जयकुमार गोरे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते, असे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रभाकर देशमुख यांची चौकशी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहेत. प्रभाकर देशमुख यांच्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com