Sanjay Kshirsagar : लोकसभेला भाजपने, तर विधानसभेला पवारांनी डावलले; संजय क्षीरसागरांची भूमिका काय?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा उमेदवारीचे गणित डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले संजय क्षीरसागर यांची भूमिका काय असणार, याची उत्सुकता मोहोळकरांना आहे.
Sharad Pawar-Sanjay Kshirsagar
Sharad Pawar-Sanjay Kshirsagar Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 October : मोहोळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विधानसभा उमेदवारीचे गणित डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले संजय क्षीरसागर यांची भूमिका काय असणार, याची उत्सुकता मोहोळकरांना असणार आहे.

क्षीरसागर यांना लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने डावलेले होते, तर विधानसभेला पवारांनी डावलले आहे. त्यामुळे क्षीरसागर हे मोहोळमधून अपक्ष निवडणूक लढवणार की पवारांच्या पक्षात कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महायुतीकडून मोहोळमधून (Mohol) राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांच्या विरोधात आता महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

सिद्धी कदम यांचा सामना आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्यासारख्या कसलेल्या नेत्यांशी असणार आहे. मोहोळ मतदारसंघाची सर्व सूत्रे राजन पाटील यांच्याकडे असून त्यांच्याच नेतृत्वाखाली यशवंत माने हे निवडणूक लढवणार आहेत. या मातब्बरांच्या रणनीतीपुढे रमेश कदम आणि सिद्धी कदम यांचे कसब पणाला लागणार आहे.

Sharad Pawar-Sanjay Kshirsagar
Mohol Constituency : माजी आमदार रमेश कदमांच्या कन्येला मोहोळमधून पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी

मोहोळचे क्षीरसागर घराणे आणि भाजप असे एकेकाळी समीकरण होते. मात्र, मागील काही निवडणुकांमध्ये क्षीरसागरांना डावलण्यात आले होते. विशेषतः मागील लोकसभा निवडणुकीत संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) हे सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, भाजपने क्षीरसागर यांना डावलून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती, त्यामुळे संजय क्षीरसागर यांनी नाराज होऊन भाजप सोडला होता.

सोलापूर लोकसभा मतदारसंंघाच्या उमेदवारीत भाजपकडून डावलण्यात आल्यामुळे संंजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. मोहोळ मतदारसंघाच्या उमेदवारीचे राजकीय गणित डोक्यात ठेवूनच त्यांनी हा घड्याळ हाती घेतले होते. उमेदवारीसाठी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे मुलाखतही दिली होती. मात्र, पवारांनीही क्षीरसागर यांना डावलले आहे. याच कारणामुळे क्षीरसागर यांनी भाजप सोडला होता, पुन्हा राष्ट्रवादीतही क्षीरसागर यांना डावलण्यात आले आहे.

Sharad Pawar-Sanjay Kshirsagar
Prashant Paricharak : प्रशांत परिचारक आता कार्यकर्त्यांना कोणाच्या दावणीला बांधणार?

माजी आमदार रमेश कदम, संजय क्षीरसागर, राजू खरे, अभिजीत ढोबळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, पवार यांनी या सर्वांना डावलून रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उर्वरीत इच्छुकांची भूमिका काय अणार, याची उत्सुकता मोहोळकरांना आहे. क्षीरसागर यांच्या पदरी आलेली उपेक्षा ते सहन करून राष्ट्रवादीतच राहतात की अपक्ष निवडणूक लढवतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com