Prashant Paricharak : प्रशांत परिचारक आता कार्यकर्त्यांना कोणाच्या दावणीला बांधणार?

Assembly Election 2024 : मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी येथे प्रशांत परिचारक यांचा समर्थकांनी तयार केलेला ‘व्हॉट्स ॲप ग्रुप’ कार्यकर्त्यांनी रात्रीच बंद करून टाकला आहे. ‘पांडुरंग परिवार’ या ‘व्हॉट्स ॲप ग्रुप’ वर एका समर्थकाने थेट परिचारक यांनाच सवाल केला आहे.
Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 27 October : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंढरपुरात हजेरी लावून आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात मनोमिलन घडविण्यात यश मिळविले. दोन नेत्यांमध्ये मनोमिलन झाले असले तरी कार्यकर्त्यांपर्यंत ते पोचणार का, असा सवाल आहे. मात्र, मंगळवेढ्यातील एका बैठकीत ‘पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांना दुसऱ्याच्या दावणीला बांधणार नाही’, असा शब्द प्रशांत परिचारक यांनी दिला होता. त्याचे काय झाले, असा सवाल परिचारक समर्थकांच्या पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांने विचारला आहे, त्यामुळे दोन्ही गटांत कटुता दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी पंढरपूर मतदारसंघातून बैठकींचा धडाका लावला होता. समर्थकांकडून त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आग्रह होत होता. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील बैठकांमध्ये स्वतः परिचारक यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः त्यांच्याकडून सहकार्य होत नसल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली होती.

विधानसभेची निवडणूक (Assembly Election) जाहीर होण्याच्या तोंडावर परिचारक यांनी बैठका घेत निवडणूक लढविण्याचा माहौल तयार केला होता, त्यामुळे परिचारक यांना भाजपने तिकिट न दिल्यास ते अपक्ष निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, तेवढे धाडस माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दाखवलेले नाही.

दरम्यान, पंढरपुरात विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तातडीने पंढरपूर गाठले होते. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्या समवेत बैठक घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्या बैठकीला आमदार समाधान आवताडे यांनाही आमंत्रित केले होते.

Prashant Paricharak
Dharmaraj Kadadi : प्रणिती शिंदेंना उत्तर दिलं नाही; पण पवारांचा शब्द टाळू शकलो नाही; काडादींनी सांगितले उमेदवारीमागचे कारण...

आवताडे आणि परिचारक यांच्यात मनोमिलन घडविण्यात बावनकुळे यांना यश आले. मात्र, नेत्यांमधील मनोमिलन कार्यकर्त्यांना आवडलेले दिसत नाही. कारण, खुद्द परिचारक यांनाच कार्यकर्त्यांकडून सवाल केले जात आहेत.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रशांत परिचारक यांनी पक्षाचा आदेश मानून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडली जाईल, असे सांगितले. परिचारक हे विधानसभेच्या आखाड्यात नसणार, हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियातून त्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील मानेवाडी येथे प्रशांत परिचारक यांचा समर्थकांनी तयार केलेला ‘व्हॉट्स ॲप ग्रुप’ कार्यकर्त्यांनी रात्रीच बंद करून टाकला आहे. ‘पांडुरंग परिवार’ या ‘व्हॉट्स ॲप ग्रुप’ वर एका समर्थकाने थेट परिचारक यांनाच सवाल केला आहे.

Prashant Paricharak
Kothe Politic's : सोलापुरात काका-पुतण्याला आमदारकीची संधी; विधानसभेच्या इतिहासात नाव कोरणार?

प्रशांतमालक, पाठखळच्या बैठकीत माझ्या कार्यकर्त्याला कुणाच्या दावणीला बांधणार नाही, असा शब्द तुम्ही दिला होता, त्या शब्दाचे काय झाले, असा सवाल केला आहे. त्यामुळे भाजपश्रेष्ठी आणि कार्यकर्ते यांच्यात मात्र परिचकांची कोंडी झाली आहे

Edited BY : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com