Sangola Politic's : गणपतआबांनी कायम कार्यकर्त्याला संधी दिलेल्या सांगोल्यातून यंदा DCC त कोण येणार? : आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या निर्णयाकडे लक्ष

Solapur Dcc Bank Election 2026 : सोलापूर डीसीसी बँकेच्या आगामी निवडणुकीत सांगोला सोसायटी मतदारसंघातून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख स्वत: निवडणूक लढवणार की कार्यकर्त्याला संधी देणार, याकडे लक्ष लागले आहे.
Chandrakant Deshmukh-Babasaheb Deshmukh
Chandrakant Deshmukh-Babasaheb DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर, 23 August : माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांच्या मृत्यूनंतर आणि डॉ. बाबासाहेब देशमुख सांगोल्यातून आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या काही महिन्यांत होणार आहे. (कै.) देशमुख यांनी २०१० पर्यंत सांगोल्यातील सोसायटी मतदारसंघातून कार्यकर्त्याला संधी दिली. ते स्वत: कधी डीसीसीचे संचालक झाले नाहीत. पण, त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांच्या रुपाने २०१० आणि २०१५ मध्ये ही संधी प्रथमच देशमुखांच्या घरात आली. आता होणाऱ्या निवडणुकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख ही संधी दुसऱ्याला देणार की स्वत:ला घेणार?, या बद्दल कमालीची उत्सुकता आहे.

सांगोल्यात सध्या ८२ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. यातील जवळपास निम्म्या सोसायट्यांवर आजही शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. त्या खालोखाल माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार शहाजी पाटील व भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. शेकापचा काय निर्णय होतो? आणि विरोधकांची मोट कशी आणि कोण बांधतो? यावर येथील सोसायटी मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे.

इतर शेती संस्था/दुग्ध संस्था मतदारसंघातून डीसीसीवर येणारे माजी आमदार साळुंखे यांना या वेळी या मतदारसंघातून येण्यासाठी अनेक अडचणी दिसत आहेत. जवळ्यातून झेडपीच्या निवडणुकीमध्ये पुत्राच्या झालेल्या पराभवाची सल आजही असल्याचे त्यांच्या देहबोलीतून दिसते. त्यामुळे सोसायटी मतदारसंघाच्या बाबतीत ते काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगोल्याच्या सोसायटी मतदारसंघातून १९८६ मध्ये जगन्नाथ कोळेकर यांनी संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९८६ ते २०१० पर्यंत रामचंद्र वाघमोडे यांनी संचालक म्हणून काम पाहिले. २०१० व २०१५ मध्ये चंद्रकांत देशमुख यांनी या मतदारसंघातून डीसीसीत प्रवेश केला आणि माजी आमदार संजयमामा शिंदे डीसीसीचे अध्यक्ष असताना देशमुख यांनी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. शेकापमध्ये व्यक्तीच्या निर्णयापेक्षा पक्षातील केडरला अधिक महत्व असते. सांगोल्यातून डीसीसीवर कोणाला पाठवायचे? याचा निर्णय केडर घेईल, असे संकेत आमदार डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

Chandrakant Deshmukh-Babasaheb Deshmukh
Satara IT Park : सातारा आयटी पार्कबाबत उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा : येत्या 15 ते 20 दिवसांत पुण्यात होणार महत्वपूर्ण निर्णय

सांगोल्याने दिले अभ्यासू सदस्य

(कै.) गणपतराव देशमुख यांनी १९६२ ते २०१९ या ५७ वर्षांच्या कालखंडात ११ वेळा म्हणजेच तब्बल ५४ वर्षे सांगोल्याची आमदारकी जिंकली. २०१० मध्ये डीसीसीचे संचालकपद वगळता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांमधील एकही पद घरात घेतले नाही. तालुक्यातील कार्यकर्त्यांनाच संधी दिली.

सांगोल्यातून डीसीसी बँक, जिल्हा दूध संघ आणि जिल्हा परिषद या जिल्हास्तरावर आलेल्या शेकापच्या कार्यकर्त्यांनी आपल्या चिवटपणाची व अभ्यासूपणाची छाप उमटवली. या संस्थांमधील त्या कार्यकर्त्यांची कारकिर्द आजही सर्वांच्या लक्षात आहे.

Chandrakant Deshmukh-Babasaheb Deshmukh
Karad Politic's : पृथ्वीराजबाबा, तुमचा पराभव नेमका कशामुळं झालाय? हे एकदा ठरवा : अतुल भोसलेंचा टोला

सध्या कोणता नेता कोणासोबत? जनतेला पडले कोडे

आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे आजही या ना त्या मार्गाने राज्यातील सत्तेचे वाटेकरी आहेत. सध्या कोणता नेता कोणासोबत आहे, याचे कोडे जसे सर्वांना आहे, तसेच कोडे तालुक्यातील कोणता कार्यकर्ता कोणाचा आहे? याबद्दलही आहे. त्यामुळे तीनही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्या अस्तित्वासाठी प्रचंड खटाटोप करावी लागत असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com