Satara IT Park : सातारा आयटी पार्कबाबत उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा : येत्या 15 ते 20 दिवसांत पुण्यात होणार महत्वपूर्ण निर्णय

Uday Samant Announcement : सातारा आयटी पार्कसाठी जागा हस्तांतरण प्रक्रियेतील अडचणी दूर झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. देशातील आयटी उद्योजकांसाठी पुण्यात १५ ते २० दिवसांत परिषद होणार आहे.
Uday Samant
Uday Samant Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 23 August : सातारा आयटी पार्कसाठीच्या जागा हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात काही अडचण राहिलेली नाही. आयटी पार्कसाठी देशातील आयटी उद्योजकांना एकत्र आणून येत्या १५ ते २० दिवसांत पुण्यामध्ये परिषद घेत आहोत. त्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई पुढाकार घेत आहेत, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील उद्योजक, मराठी भाषेसाठी साहित्यीकांच्या बैठकीनंतर उद्योग मंत्री सामंत यांनी कऱ्हाड (जि. सातारा) येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, कऱ्हाडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आदी उपस्थित होते.

सातारा आयटी पार्कसाठीच्या जागा हस्तांतरण प्रक्रिये स्थानिक पातळीवर अडकल्याच्या प्रश्नावर आजच निर्णय घेतला आहे, असे सांगून मंत्री सामंत म्हणाले, सातारा आणि कोल्हापुर येथे दोन आयटी पार्क सुरु करीत आहोत. साताऱ्यातील जागेसंदर्भात काही अडचण राहिलेली नाही. पुण्यात दोन्ही जिल्ह्यांच्या आयटी पार्कसाठी देशातील आयटी उद्योजकांना आणून परिषद घेत आहोत. त्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, शंभूराज देसाई पुढाकार घेत आहेत.

येत्या १५ ते २० दिवसात ही परिषद पुण्यात घेत आहोत. त्यामध्ये काही राजकीय अडसर असण्याचा प्रश्न नाही. पक्षीय राजकारणांपेक्षा तरुणांना रोजगार मिळणे, हाच मुख्य अजेंडा आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र आले पाहिजे, अशी अपेक्षाही सामंत यांनी बोलून दाखवली.

ते म्हणाले, कऱ्हाड औद्योगीक वसाहतीत सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्त्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. आठ दिवसांत त्याची कार्यवाही सुरु होईल. त्याची निविदा होऊन पावसाळ्यानंतर कामास प्रारंभ होईल. अमाथाडी कामगार, त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून त्यांचा त्रास होत आहे. कामगारांवर कोणी दादागिरी करत असेल तर संबंधितावर कडक कारवाईच्या सूचना मी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना दिलेल्या आहेत. त्याची राज्यातील संबंधितांनी नोंद घ्यावी.

Uday Samant
Karad Politic's : पृथ्वीराजबाबा, तुमचा पराभव नेमका कशामुळं झालाय? हे एकदा ठरवा : अतुल भोसलेंचा टोला

कऱ्हाड आणि खंडाळा मॅन्युफॅक्चरींग असोशिएशनच्या कार्यालयासाठी जागा देण्याची निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मीती योजनेतुन वाहनांसाठी १० टक्के कर्ज दिले जाते. सातारा, कऱ्हाड या भागातून शेतमाल, भाजी याची आवक-जावक मोठ्या प्रमाणात गाड्यातून होते. मात्र, त्यामध्ये वाढ करुन १५ टक्के कर्ज वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. औद्योगीक वसाहतीत अग्निशमन यंत्रणा कमी असतील तर मी त्याचा आढावा नक्की घेईल. अजूनही काही करायचे असेल तर ती कार्यवाही आम्ही करु, असा शब्दही सामंत यांनी दिला.

म्हसवड एमआयडीसाठी मंत्र्यांचा पुढाकार

म्हसवड औद्योगीक क्षेत्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या भूसंपादसाठी ५०० कोटींची तरतुद केली आहे. त्यासाठी मंत्री जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे म्हसवडमध्ये नवीन एमआयडीसी होत आहे. खंडाळा एमआयडीसीसाठी ९० टक्के शेतकरी जागा देण्यासाठी राजी झाले आहेत. त्यांची जागा घेऊन तेथील एमआयडीची कार्यवाही आम्ही सुरु करत आहोत.

Uday Samant
Sunetra Pawar Video : राष्ट्रवादी काँग्रेसला एकटं पाडलं, सुनेत्रा पवारांनी रणशिंग फुंकलं; म्हणाल्या, 'अजितदादांनी 300 कोटी...'

कऱ्हाड विमानतळाचे उर्वरीत कामही करणार

कऱ्हाड विमानतळाच्या विस्तारीकरणासह उर्वरित जमीन अधिग्रहणाच्या कामाचाही आपण आढावा घेणार असल्याचे मंत्री सामंत यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई येथे नुकतीच आढावा बैठक झाल्याची माहिती दिली असून, उर्वरित काम लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com