Mohite Patil : मोहिते पाटलांची चौथी पिढी राजकारणात; अकलूज नगर परिषदेसाठी कुटुंबातील तिघांचे अर्ज

Akluj Nagar Parishad Election 2025 : लूज नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत मोहिते-पाटील परिवारातील तिघांनी उमेदवारी दाखल केली असून सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या रूपाने घराण्याची चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.
UrvashiRaje Dhavalsinh Mohite-Patil-Sangramsinh Mohite Patil-Shivtejsinh Mohite Patil
UrvashiRaje Dhavalsinh Mohite-Patil-Sangramsinh Mohite Patil-Shivtejsinh Mohite Patil Sarkarnama
Published on
Updated on
  1. अकलूज नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत मोहिते-पाटील घराण्यातील तिघा सदस्यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज भरत चौथी पिढी सक्रिय राजकारणात दाखल झाली आहे.

  2. नगरसेवक पदासाठी १५१ आणि नगराध्यक्षपदासाठी ७ अर्ज दाखल झाल्याने निवडणूक राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, मविसे, वंचित आघाडी इत्यादी पक्षांसह बहुरंगी स्वरूप धारण करणार आहे.

  3. नगराध्यक्ष पदासाठी विविध पक्षांतील सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून अंतिम मुकाबला अर्ज माघारी घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Solapur, 18 November : अकलूज नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत मोहिते-पाटील परिवारातील तिघांचे नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या रूपाने मोहिते-पाटलांची चौथी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जयसिंह मोहिते पाटील यांचे नातू आणि संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव सयाजीराजे मोहिते पाटील (Mohite Patil) व शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. तसेच उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे.

अकलूज (Akluj) नगर परिषद निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठी १५१ तर नगराध्यक्ष पदासाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. नगरपरिषदेच्या फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस, मविसे, वंचित आघाडी या पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याने ही निवडणूक बहुरंगी होणार आहे.

UrvashiRaje Dhavalsinh Mohite-Patil-Sangramsinh Mohite Patil-Shivtejsinh Mohite Patil
Balraje Patil : ‘अजित पवारऽऽ सगळ्यांचा नाद करायचा; पण अनगरकरांचा नाद करायचा नाही’ राजन पाटलांच्या चिरंजीवाचे थेट चॅलेंज

नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून पूजा कोतमिरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पक्षाकडून प्रतिभा गायकवाड व रेश्मा अडगळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ॲड. दिव्यानी रास्ते, महाराष्ट्र विकास सेनेकडून सुवर्णा साठे, वंचित बहुजन आघाडीकडून उषा सुनील कांबळे व उमा शंकरराव गायकवाड यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

UrvashiRaje Dhavalsinh Mohite-Patil-Sangramsinh Mohite Patil-Shivtejsinh Mohite Patil
Angar Nagar Panchayat : अनगरमध्ये राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद; राजन पाटलांची सूनच होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

निवडणूक पक्षीय पातळीवर बहुरंगी होणार असली तरी या निवडणुकीतून कोणते उमेदवार अर्ज माघारी घेणार यावर चित्र अवलंबून असून ते अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीच स्पष्ट होईल.

1. मोहिते-पाटील घराण्यातील कोण सक्रिय राजकारणात दाखल झाले?
→ सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या रूपाने मोहिते-पाटलांची चौथी पिढी सक्रिय झाली.

2. अकलूज नगरपरिषदेसाठी किती अर्ज दाखल झाले?
→ नगरसेवक पदासाठी १५१ आणि नगराध्यक्षपदासाठी ७ अर्ज दाखल झाले.

3. नगराध्यक्षपदासाठी कोणते प्रमुख पक्ष मैदानात आहेत?
→ भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी, मविसे आणि वंचित आघाडी.

4. निवडणुकीची अंतिम लढत कधी स्पष्ट होईल?
→ अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com