

Solapur, 12 January : (स्व.) राजीव सातव हे काँग्रेसचे सालस आणि सोज्वळ नेतृत्व होतं, त्यामुळे त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना आम्ही आमदार केलं होतं. भाजपकडे एवढे आमदार असताना त्यांच्या पत्नीला भाजपनं का घेतलं? ज्यांना संघर्ष आणि सेवा नको आहे, फक्त मेवा हवा आहे, अशीच लोकं काँग्रेस सोडून जात आहेत. राजकारणात निष्ठेची भिंत छोटी होत आहे, अशी खंत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलून दाखवली.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे सोलापूरमध्ये आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यात त्यांनी प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे गजनी आहेत. मोदीही तसेच आहेत. कारण बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ तो सुभान अल्लाह.
मोदींनी हर घर नल, असं म्हटलं होतं. पण, सोलापूरची पाण्याची परिस्थिती आजही आठ दिवसांनी पाणी येण्याचीच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असं म्हटलं होतं. मात्र त्यांचं लग्न झालं आणि मुलगीही झाली, त्यामुळे ते गजनी आहेत, असा दावाही हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अजित पवारांना चक्की पिसिंग पिसिंग असं म्हटलं होतं. मात्र, ते आता त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. शासकीय योजनेतला निधी आणि भूमाफिया, अवैध व्यवसाय आणि गुंडागर्दीच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये पैसे आणण्याचा प्रकार आहे. राजकीय अभिनवेशाच्या पलीकडे जाऊन आता महाराष्ट्र वाचवण्याची गरज आहे. बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपया, असं वगनाट्य सध्या भाजपकडून सुरू आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींचे पैसे द्या, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा, असं आम्ही म्हणत नाही. मात्र, हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. बिहारमध्ये 10 हजार खात्यावर टाकून दिले, पुढे आसाममध्येही तोच कित्ता गिरवला जाणार आहे. सुरुवातीच्या काळात हेच लोक स्कॉलरशिपला फुकट अनुदान योजना म्हणत होते, असा दावाही सपकाळांनी केला.
भाजप हा देशबुडव्या अन् लोकशाही बुडव्या पक्ष
भाजपचा बाप हा हिटलर आहे, ते ग्लोबल्स नितीचा वापर करतात. भाजपचा पॅटर्न हा बलात्कारी जनता पॅटर्न आहे. भाजप हा देशबुडव्या आणि लोकशाही बुडव्या पक्ष आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.