NCP Anniversary Day In Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (Ncp) २५ वा वर्धापनदिन अहमदनगर शहरात १० जून रोजी पार पडणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. पक्षाचं मोठं शक्तीप्रदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी पक्षाकडून विराट सभेचं आयोजन करण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दोन वेळा अहमदनगरला जिल्ह्याचा आढावा घेतला. वर्धापनदिन अहमदनगर जिल्ह्यातच का आयोजित केला गेला याचे, कारण आता विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. (NCP's anniversary in the ahmednagar city)
यावेळी अजित पवार म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन १० जून रोजी पार पडणार आहे. यापूर्वी अहमदनगरला येथे ९ जून रोजी पक्षाची सभा होणार आहे. अहमदनगरच्या लगतच्या जिल्ह्यांतून पुणे, बीड, नाशिक या जिल्ह्यांतून पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येतील, असे अजित पवार म्हणाले.
तसेच अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी पक्षाची मोठी शक्ती आहे. आमदारांची जिल्ह्यात संख्याही अधिक आहे. या सर्वाचा विचार करून हा पक्षाचा मेळावा नगरमध्ये आयोजित केला आहे. तत्पूर्वी नऊ जून रोजी सायंकाळी पाच वाजता सभा आयोजित केले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात केडगाव येथे ही सभा होणार आहे. या सभेची पक्षाकडून तयारी सुरू आहे. नगर जिल्ह्यात संग्राम जगताप, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, किरण लहामटे, निलेश लंके असे पाच पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. या सर्व आमदारांवर सभा व मेळाव्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या साठी सर्व आमदार यासाठी काम करत आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुका नजीक येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकींच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेससाठी बीड, अहमदनगर, नाशिकमधील लोकसभा जागा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. आघाडीमध्ये अहमदनगरची लोकसभा जागा राष्ट्रवादीकडेच आहे.
मागील अनेक लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ही जागा पटकावता आलेली नाही. येथील विद्यमान खासदार सुजय विखे यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी राष्ट्रवादी तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. याच दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. याच सभेतून एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची रणशिंग फुंकले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.