Suhas Kande News : आमदार सुहास कांदेंचा आता मच्छिमारांसाठी लढा; म्हणाले, ''...तर वेळप्रसंगी जलसमाधी घेईल!''

Nashik News : ''...तर मी सरकार विरोधात आंदोलन करणार!''
Suhas Kande News
Suhas Kande News Sarkarnama

Nashik : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी गिरणा धरणातील स्थानिक मच्छिमार बांधवांच्या धरणात जमिनी गेल्या आहेत. येथील मच्छिमारीवर मुळ हक्क त्यांचा आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांवरील अन्याय सहन करणार नाही. ठेकेदाराला जशास तसे उत्तर देवू. धरण मच्छिमार महामंडळाच्या ताब्यातून मत्स्य विभागाच्या ताब्यात दिल्याशिवाय व ठेका रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी येथे दिला.

वाऱ्हीबर्डी-दहिवाळ शिवारातील आदिवासी मच्छिमार बांधवांच्या महामेळाव्यात ते बोलत होते. कांदे म्हणाले, अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. ज्यांनी आंदोलन सुरू केले, त्यांना धन्यवाद देतो. आता पाणी नाका तोंडाच्यावर जातंय. कुणी बिलाल खतीब बाहेरुन येतो अन् तुम्हाला दम देतो हे खपवून घेणार नाही. उद्यापासून कोणीही व्यापारी, ठेकेदार येवो त्याला एक रुपया द्यायचा नाही.

Suhas Kande News
Nilwande Dam : 'श्रेयासाठी सगळे पुढे, पण निळवंड्याची कामे...' ; थोरातांचा शिंदे-फडणवीसांना चिमटा..

स्थानिक मच्छिमारांवरील अन्याय सहन करणार नाही. ठेकेदाराला जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही सुहास कांदे(Suhas Kande) यांनी यावेळी दिला. तसेच धरण मच्छिमार महामंडळाच्या ताब्यातून मत्स्य विभागाच्या ताब्यात दिल्याशिवाय व ठेका रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी अंजुम कांदे, साईनाथ गिडगे, महेंद्र दुकळे, सुरेश शेलार, ज्ञानेश्‍वर कांदे, संग्राम बच्छाव, बाळासाहेब कांदे, महेंद्र शिसोदे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी व्यासपीठावर होते.

Suhas Kande News
Malegaon News : मालेगावात राष्ट्रवादी आकमक; महापालिका आयुक्तांवर गंभीर आरोप, नामफलकाला काळं फासलं

...तर सरकार विरोधात आंदोलन करणार!

स्थानिक मच्छिमारांनी चिलापी, भडका, बापदा व धरणात निघणाऱ्या स्थानिक माश्याला पैसा द्यायचा नाही. यासाठी मी सरकार विरोधात आंदोलन करणार. पोलिसांनी मच्छिमारांचे जप्त केलेले जाळे व साहित्य परत करावे. अन्यथा ठेकेदाराचे गोडावून तोडून मी सर्व माल काढून देईल. आठ दिवसांत गुन्हे मागे घेण्याची व जप्त साहित्य परत देण्याची कारवाई करा.

आगामी काळात त्यांच्या माणसांना जशास तसे उत्तर द्या. पोलिसां(Police)नी मच्छिमार बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करु नये असे सांगतानाच आजवर मच्छिमार बांधवांवर दाखल झालेल्या गुन्ह्यातील फिर्यादी अन्वर खान यांना व्यासपीठावर बोलावून त्यांनी तक्रारी मागे घेण्याची विनंती केली. खान यांनी या सर्व खोट्या तक्रारी बिलालमुळे झाल्या. आपण प्रतिज्ञापत्र देऊन तक्रारी मागे घेवू असे जाहीर केलं.

Suhas Kande News
Jayant Patil News : पुणे लोकसभेबाबत राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचं सूचक विधान; म्हणाले,''...अंतिम निर्णय घेऊ!''

मागील सरकारच्या काळात बिलालचा नातेवाईक मंत्री होता. म्हणून त्याला ठेका मिळाला. अडीचशे धरणांची निविदा रद्द झाली मग याची कां नाही. बिलाल आपल्याकडे येत नाही. माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना थारा नाही. वेळप्रसंगी तुमची तयारी असेल तर मी तुमच्या बरोबर पहिली पाण्यात उडी घेऊन जलसमाधी घेईल. ठेकेदाराने अटीशर्थीचा भंग केला असल्याने त्याचा ठेका रद्द झालाच पाहिजे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासोबत विशेष बैठक

मुख्यमंत्री(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री व संबंधित मंञ्यांची भेट घेऊन विशेष बैठक घेवू. मेळाव्यात संजय शिवदे, उमेश पाटील, बाबाजी पवार, राजेंद्र मोरे, निर्मला वाघ, अंजुम कांदे आदींची भाषणे झाली. त्यांनी धरण महामंडळाकडून मत्स्य विभागाकडे द्यावे म्हणजे स्थानिक मच्छिमार सोसायट्यांना वाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com