Dr. Shirish Valsangkar : डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट; आत्महत्येपूर्वी तीन दिवसांत डॉक्टरांनी एकाच व्यक्तीला 11 वेळा केला फोन

Solapur Crime News : डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वीच्या तीन दिवसांत एकाच व्यक्तीला 11 वेळा फोन केला होता. त्या व्यक्तीशी डॉ. वळसंगकर हे एका सेकंदपासून 1426 सेकंदापर्यंत बोलले आहेत. डॉक्टरांनी अकरा वेळा नेमका कोणाला फोन केला, ती व्यक्ती कोण आहे
Dr. Shirish Valsangkar
Dr. Shirish ValsangkarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 04 July : डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सीडीआर रिपोर्टमधून अनेक गोष्टी पुढे येत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वीच्या तीन दिवसांत डॉ. वळसंगकर यांनी एकाच व्यक्तीला तब्बल 11 वेळा फोन केल्याचे सीडीआर रिपोर्टमध्ये दिसून आले. आत्महत्येपूर्वी डॉक्टर त्या व्यक्तीशी एका सेकंदापासून 1426 सेकंदापर्यंत बोलले आहेत. त्यामुळे आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी अकरा वेळा नेमका कोणाला फोन केला, असा सवाल उपस्थित होत आहे.

विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी डोक्यात गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली होती. मात्र, तिची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तब्बल 940 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. मात्र, या दोषारोपत्रात पोलिसांनी डॉक्टरांच्या फोनचा सीडीआर जोडला नव्हता. मात्र, मनीषा मुसळे माने हिच्या वकिलांनी केलेल्या मागणीनंतर डॉक्टरांच्या फोनचा सीडीआर जोडण्यात आलेला आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनीषा मुसळे माने (Manisha Mane Musale)हिच्या जामीन अर्जावर निकाल देताना न्यायालयाने अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. दोषारोपपत्रातील त्रुटींवरही बोट ठेवले आहे. त्यात मनीषाचे कृत्य आणि डॉक्टरांची आत्महत्या यांचा थेट संबंध येत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या आत्महत्येमागेचे कारण काय असा सवाल अनुत्तरित राहत आहे.

रुग्णालयातून डॉक्टरांनी लक्ष काढले होते. मात्र, डिसेंबर 2024 मध्ये डॉक्टर वळसंगकर यांनी हॉस्पिटलमध्ये पुन्हा लक्ष घालायला सुरुवात केली होती. त्याचवेळी डॉक्टरांनी मनीषा मुसळे माने हिचे हॉस्पिटलमधील अधिकार कमी केले होते. त्यानंतर मनीषा मुसळे माने हिने केलेल्या घाणेरड्या आणि खोटारड्या आरोपामुळे आपण जीवन संपवत आहोत, असे डॉक्टरांनी मला भेटून आणि फोन करून सांगितले होते, असे त्यांचा मुलगा डॉ. अश्विन यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलेले आहे.

Dr. Shirish Valsangkar
Raju Khare : शिंदेसेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावणाऱ्या राजू खरेंवर कारवाई करणार का? राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने घेतली रोखठोक भूमिका

डॉ. वळसंगकर यांच्या सीडीआर रिपोर्टमधून दुसरीच माहिती पुढे आली आहे. त्यात डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वीच्या तीन दिवसांत एकाच व्यक्तीला 11वेळा फोन केला होता. त्या व्यक्तीशी डॉ. वळसंगकर हे एका सेकंदपासून 1426 सेकंदापर्यंत बोलले आहेत. डॉक्टरांनी अकरा वेळा नेमका कोणाला फोन केला, ती व्यक्ती कोण आहे, हे दोषारोपपत्रातून स्पष्ट होत नाही, त्यामुळे डॉक्टरांच्या आत्महत्येच्या कारणाचे गूढ वाढले आहे.

दरम्यान, डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या मुलगा डॉ. अश्विन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली होती. तिला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. या आत्महत्या प्रकरणी 26 सप्टेंबर रोजी दोषनिश्चिती करण्यात येणार आहे. त्यानुसार मनीषा मुसळे माने हिला आरोप गुन्हा कबूल आहे की नाही, हे निश्चित करावे लागणार आहे. त्यानंतर खटल्याची सुनावणी होईल.

Dr. Shirish Valsangkar
Maharashtra Politic's : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; राज अन्‌ उद्धव ठाकरेंना का दिल्या शुभेच्छा!

मनीषा मुसळे माने हिचे वकील प्रशांत नवगिरे यांनी मुसळे माने हिच्यावरील आरोप खोटे आहेत, त्यांना देष करण्यात यावे, असा अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com