Ranjitsinh Mohite Patil :भाजपविरोधात काम करणाऱ्या मोहिते पाटलांवर कारवाई होणार का?; बावनकुळेंच्या उत्तराने वाढविले रणजितदादांचे टेन्शन

Chandrashekhar Bawankule Suggestive Statement : कारवाईचा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच कारवाईबाबतचा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे अगोदर पाहिले आणि त्यानंतर उत्तर दिले.
Chandrashekhar Bawankule-ranjitsinh Mohite Patil
Chandrashekhar Bawankule-ranjitsinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 29 May : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपविरोधात काम केल्याचा आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यावर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, मोहिते पाटील यांच्यावर अद्याप भाजपकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे. बावनकुळे यांनी दिलेल्या उत्तराने मोहिते पाटील यांचे टेन्शन मात्र वाढविले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्या कारवाईचा विषय हा आमची केंद्रीय स्तरावर अनुशासन समिती आहे. त्या केंद्रीय अनुशासन समितीकडे आमदार मोहिते पाटील यांचा विषय आहे. पक्षाची केंद्रीय अनुशासन समिती त्याबाबतचा निर्णय घेईल.

एखाद्या विधानसभा अथवा विधान परिषद सदस्यावर शिस्तभंगाची कारवाई करायची असेल, तो निर्णय केंद्रीय भारतीय जनता पक्षाकडून घेतला जातो. भाजपच्या केंद्रीय अनुशासन समितीने लोकांच्या तक्रारी, त्यांचं जे काही म्हणणं आहे, ते ऐकून घेतलं आहे. त्यावर योग्य तो निर्णय होईल. अनुशासन समितीला जे काही आढळेल, त्यानुसार समिती निर्णय घेईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार राम सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षविरोधात काम केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली होती. मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी सातपुते आग्रही होते. त्यानुसार त्यांनी भाजपचे सोलापूर पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे ठराव घेतले होते. तसेच, आमदार श्रीकांत भारतीय यांनीही मोहिते पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.

Chandrashekhar Bawankule-ranjitsinh Mohite Patil
Bawankule On Deshmukh Displeasure : दोन देशमुखांच्या नाराजीबाबत चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, ‘त्यांची समजूत...’

भाजपकडून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विषयी आलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांनी नोटीसीला उत्तर दिले आहे. तसेच, मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. सदस्य नोंदणीच्या कामगिरीबद्दल प्रदेशाध्यक्षांनी पत्र पाठवून त्यांचे कौतुक केले आहे. तसेच, त्यांच्या मुलाच्या लग्नाला खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होणार का, हा खरा प्रश्न आहे.

Chandrashekhar Bawankule-ranjitsinh Mohite Patil
Mahayuti News : 'स्थानिक'च्या निवडणुकीत महायुतीला तडा? भाजपची स्वबळावर मैदान मारण्याची तयारी, तर राष्ट्रवादी एकत्रित लढण्यावर ठाम !

रणजितदादांच्या उपस्थितीतच बावनकुळे कारवाईबाबत बोलले

दरम्यान, कारवाईचा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीतच कारवाईबाबतचा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे अगोदर पाहिले आणि त्यानंतर उत्तर दिले. त्या वेळी मोहिते पाटील मात्र मान खाली घालून व्यासपीठावर बसले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com