Chandrashekhar Bawankule : व्यग्र वेळापत्रकातून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी, कुटुंबीयांचे केले सात्वंन...

Chandrashekhar Bawankule BJP : उद्योजक सतीश गडाळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडाळे परिवाराची भेट त्यांचे सात्वंन केले.
Minister Chandrashekhar Bawankule consoles Gadale family at BJP leader’s home despite his busy schedule
Minister Chandrashekhar Bawankule consoles Gadale family at BJP leader’s home despite his busy schedulesarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते सरकारी कार्यक्रमात व्यग्र झाले. आज (सोमवार) देखील बावनकुळे यांचे नियोजित बैठका आणि कार्यक्रम सुरूच होते. मात्र, या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत ते आज सकाळी भाजपचे पदाधिकाऱ्याच्या घरी गेले.

उद्योजक सतीश गडाळे यांचे शुक्रवार (ता.2) अकस्मात निधन झाले. सतीश गडाळे यांच्या पत्नी सुनंदा गडाळे या माजी नगरसेविका आहेत. सतीश गडाळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गडाळे परिवाराचे सात्वंन करण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले.

Minister Chandrashekhar Bawankule consoles Gadale family at BJP leader’s home despite his busy schedule
Mahayuti government cabinet meeting : वेड्याबाभळीनं वेढलेल्या चौंडीचं 31 वर्षांत रुपचं बदललं; दीड हजार मतदानाचं गाव आता हायटेक झालं

बावनकुळे यांनी सतीश गडाळे यांना फोटोला पुष्प अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. सतीश गडाळे यांचे ज्येष्ठ पुत्र तुषार गडाळे यांच्याशी संवाद साधला. सतीश गडाळे यांचे पुतणे तेजस गडाळे हे भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत. तेही यावेळी उपस्थित होते.

भाजप कार्यकर्त्यांशी संवाद

चंद्रशेखर बावनकुळे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची संवाद साधला. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिने त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच बावनकुळे हे बी.एम.सी.सी. कॉलेज, पुणे येथे आयोजित ढोल ताशा महासंघाच्या अधिवेशनाला देखील आवर्जून उपस्थित राहिलो. ढोल ताशा पथके हे आपल्या समृद्ध संस्कृतीचे खऱ्या अर्थाने वारसदार व वाहक आहेत. या सर्व ढोल ताशा पथकांमागे सरकार ठामपणे उभे असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

Minister Chandrashekhar Bawankule consoles Gadale family at BJP leader’s home despite his busy schedule
MNS Vs Shivsena : 'एकनाथ शिंदेंवर नाही ठपका मग अधिकारी-ठेकेदारांना विचारा', मनसेच्या माजी आमदाराचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com