Dilip Mane On Congress : भाजपत जाता जाता माजी आमदाराने काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले; ‘माजी आमदार असूनही हर्षवर्धन सपकाळ मला...’

Dilip Mane Statement : माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमध्ये जाता जाता काँग्रेसच्या सद्यस्थितीवर परखडमध्ये भाष्य केले आहे.
Harshvardhan Sakpal-Dilip Mane
Harshvardhan Sakpal-Dilip ManeSarkarnama
Published on
Updated on

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली असून, हा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर घेतला आहे.

माने यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर नाराजी व्यक्त करत, “मी माजी आमदार असूनही प्रदेशाध्यक्षांना माझी माहिती नाही,” अशी टीका करून पक्षातील अकार्यक्षमतेवर परखड भाष्य केले.

विधानसभा निवडणुकीत बी-फॉर्म नाकारल्यापासून ते काँग्रेस पक्षापासून चार हात लांब होते. आता कार्यकर्त्यांच्या हितासाठी त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Solapur, 17 October : काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांचा भारतीय जनता पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे. खुद्द माने यांनीच पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, माने यांनी भाजपमध्ये जाता जाता काँग्रेस पक्षातील सद्यस्थितीवर परखडमध्ये भाष्य केले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ‘मी माजी आमदार असूनही माहिती नाही,’ अशी मार्मिक टिपण्णी करत काँग्रेस नेतृत्वाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने (Dilip Mane), यशवंत माने, राजन पाटील, यांच्यासह बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित आणि विक्रम शिंदे आदींनी गुरुवारी (ता. १६ ऑक्टोबर) रात्री उशिरा मुंबईत भेट घेतली. त्या भेटीतील चर्चेनुसार माने यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. त्यानंतर आज (ता. 17 ऑक्टोबर) सकाळी सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन मानेंनी त्याबाबतची माहिती दिली.

त्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसकडून (Congress) विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या फसवणुकीसंदर्भात भाष्य केले. त्या सर्व घटना आपल्यासमोर आहेत. सध्या आम्ही विरोधी पक्षात आणि सत्ताधारी पक्षातही नाही, अशी आमची स्थिती होती, त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्हाला भूमिका घेणं भाग आहे, त्यानुसार आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माने म्हणाले, सध्या आमची काहीच कामे होत नाहीत, त्यामुळे आम्ही कोणाला सांगायचं, याची अडचण होती. आम्ही सध्या जिथे (काँग्रेस) आहोत; तिथे सुधारण्याचे दिवस वाटत नाहीत. या उलट मी सध्या ज्या पक्षात आहे, तिथं बिघडतं चाललं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना ‘मी माजी आमदार असूनही माहिती नाही. नाना पटोले यांना माहिती तरी होतो’

Harshvardhan Sakpal-Dilip Mane
Dilip Mane : माझ्या भाजपप्रवेशाबाबत सुभाष देशमुखांना काय अडचण आहे का? दिलीप मानेंना मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ शब्द!

विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांना ऐनवेळी बी फार्म नाकारण्यात आला होत. त्या वेळी माने यांनी काँग्रेस नेतृत्वाबाबत जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. विधानसभा निवडणुका होऊन वर्षे होत आले तरी अजूनही मला महाराष्ट्र आणि दिल्ली पातळीवरून विचारलं गेलं नाही, अशी खंतही दिलीप माने यांनी बोलून दाखवली.

Q1. दिलीप माने यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली.

Q2. माने यांनी काँग्रेसवर कोणती टीका केली?
त्यांनी काँग्रेस नेतृत्व अकार्यक्षम असून, पक्षातील निर्णयप्रक्रिया नेत्यांपासून दुरावलेली असल्याची टीका केली.

Q3. माने यांच्या नाराजीचे कारण काय होते?
विधानसभा निवडणुकीत बी-फॉर्म नाकारला गेला आणि नंतर पक्षाकडून दुर्लक्ष झाले.

Q4. माने यांनी भाजपमध्ये का जाण्याचा निर्णय घेतला?
कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासात्मक कामांसाठी त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com