Narayan Rane News : साताऱ्यात आयटी कंपन्या आणणार : नारायण राणेंचा उदयनराजेंना शब्द

Udayanraje Bhosale मंत्री नारायण राणे यांनी आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या समवेत जलमंदीर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
Narayan Rane, Udayanraje Bhosale
Narayan Rane, Udayanraje Bhosalesarkarnama

Satara News : साताऱ्यात खासदार उदयनराजेंच्या Udayanraje Bhosale माध्यमातून आम्ही आयटी कंपन्या आणू. या कंपन्यांना आम्ही टेक्नॉलॉजी आणि कर्ज पुरवठा केंद्र सरकारच्या माध्यमातून करु. तसेच कर्जाचे व्याज कमी करण्याबाबतही राजेच बघतील, असे स्पष्ट करुन आगामी काळात खासगी जागेवर उद्योग उभारायचे असतील तर तसे प्रस्ताव द्यावेत. ५० ते ५०० एकरपर्यंत खासगी जागेवर उद्योग उभारण्यासाठी केंद्र सरकार परवानगी देईल, असे आश्वासन केंद्रीय सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले.

मंत्री नारायण राणे Narayan Rane यांनी आज खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्या समवेत जलमंदीर या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंत्री भागवत कराड, माजी आमदार आनंदराव पाटील आदी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात रोजगार निर्माण व्हावेत, स्थानिक उद्योजकांचे उत्पन्न वाढावे, यासाठी शिस्तबद्ध अशी रोजगार परिषद यशस्वी केली. उद्योग क्षेत्रात तरुण, तरुणींनी यावे व नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करावेत. यासाठी आम्ही व कराडसाहेब उपस्थित होतो.

Narayan Rane, Udayanraje Bhosale
#Shorts | १०० कोटी रुपये दान करणारे महाराष्ट्रातील खासदार माहितीये का ? | Satara | Sarkarnama

गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने देशाला प्रगतीकडे, महासत्तेकडे व आत्मनिर्भयतेकडे नेण्यासाठी प्रयत्न केले. सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेला असून तो आर्थिक समृद्ध करावा असा निर्धार केला आहे एमएसडीसी व देशा्च्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी उद्योग सुरु करावेत. सातारा जिल्ह्याचे दरडोई उत्पन वाढावे त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाणार आहे.

Narayan Rane, Udayanraje Bhosale
Mumbai NIA News : मुंबई एनआयएकडे दिली जयेशच्या तपासाची जबाबदारी, कर्नाटकातही गुन्हा दाखल !

तरुणांना मार्गदर्शन करताना लेटस्ट टेक्नॉलॉजी अवगत करण्यासाठी मदत आम्ही करणार आहोत. टेक्नीकल सेक्टरला या भागात प्राधान्य देण्याचे मान्य केले आहे. त्यासाठी येणाऱ्या अर्जाला मदत केली जाईल. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न एक लाख ८६५ हजार रुपये आहे. पश्चिम महाराष्ट्रात आर्थिक प्रगती दिसत नाही.

Narayan Rane, Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale Meets Amit Shah: दिल्लीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शाहांची भेट

राजकारणातून उद्योगाकडे वगळवावे यासाठी उदयनराजेंचा चांगला उपक्रम आहे. आयटीच्या कंपन्या साताऱ्यात उदयनराजेंच्या माध्यमातून आणल्या जातील. या कंपन्यांना टेक्नॉलॉजी व कर्ज पुरवठा केंद्र सरकारचा उद्योग विभाग करेल. व्याज कमी करायचे ही राजे बघतील. लवकरच खासगी जागेवर कोणाला उद्योग उभारायचे असतील तर प्रस्ताव द्यावेत. ५० ते ५०० एकरपर्यंत उद्योग विकास करायला केंद्र परवानगी देणार आहे.

Narayan Rane, Udayanraje Bhosale
Shambhuraj Desai Criticized Raut: नको तिथं नाक खूपसण्याची राऊतांची जुनी सवयी : शंभूराज देसाईंचा टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com