अहमदनगर - अहमदनगर महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्य जानेवारी महिना अखेरीला मुदत संपली. महापालिकेतील नवीन आठ सदस्यांची निवड व स्थायी समितीच्या नवीन सभापती निवडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप ( Sangram Jagtap ) यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांनी स्थायी समितीच्या सभापतीसाठी शब्द दिला होता. हा शब्द ते पाळणार का हे आता लवकरच कळणार आहे. ( Will MLA Sangram Jagtap keep his word? )
अहमदनगर महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्य जानेवारी महिना अखेरीला मुदत संपली. त्यामुळे नवीन आठ सदस्य निवडीचा प्रस्ताव नगर सचिव एस.बी. तडवी यांनी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या समोर मांडला होता. त्यानुसार महापौरांनी काल ( मंगळवारी ) सायंकाळी स्थायी समिती सदस्य निवडीसाठी विशेष महासभा बोलावण्याचे आदेश काढले. त्यानुसार शुक्रवारी ( ता. 11 ) दुपारी 1 वाजता महासभा होणार आहे.
स्थायी समितील मनोज कोतकर, सोनाबाई शिंदे, श्याम नळकांडे, विजय पठारे, डॉ. सागर बोरूडे, परवीन कुरेशी, प्रकाश भागानगरे व सुप्रिया जाधव हे आठ सदस्य 31 जानेवारीला संध्याकाळी निवृत्त झाले. स्थायी समितीतील चार सदस्यांच्या पत्रानुसार महापौरांनी विशेष सभा बोलावली आहे.
मागील वर्षी स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे अविनाश घुले व कुमार वाकळे यांचे नाव आघाडीवर होते. मात्र आमदार संग्राम जगताप यांनी अविनाश घुले यांना सभापती पदाची संधी दिली होती. कुमार वाकळे यांना पुढील वर्षी स्थायी समितीचे सभापती करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. त्यानुसार कुमार वाकळे यांनी माघार घेतली होती. गेल्या वर्षी वाकळेंनी घेतलेली माघार या वर्षी त्यांना संधी ठरणार असल्याची चर्चा महापालिकेत आहे. कुमार वाकळे हेच स्थायी समितीचे सभापती होणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे.
हे दिसू शकतात स्थायी समितीत
स्थायी समितीतील राष्ट्रवादी काँग्रेस 3, भाजप 2, शिवसेने 2 तर काँग्रेसची 1 जागा रिक्त झाली आहे. यासाठी शिवसेनेकडून गणेश कवडे व दत्ता कावरे, भाजपकडून वैशाली जाधव, राहुल कांबळे व गौरी ननवरे, काँग्रेसकडून रुपाली वारे यांचे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन जागांपैकी कुमार वाकळे यांचे नाव निश्चित समजले जात आहे. उर्वरित दोन नावे अजून ठरली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
मागील वर्षीची परिस्थिती वेगळी
मागील वर्षी महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची सत्ता होती. भाजपचा महापौर असल्याने राष्ट्रवादीने स्थायी समितीपद घेतले. त्यावेळीही आमदार संग्राम जगताप व त्यांचे सासरे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. त्यामुळे राष्ट्रवादीला स्थायी समितीचे सभापती पद मिळाले. मात्र जूनपासून महापौर पदाचे आरक्षण बदलले भाजपकडे उमेदवार नसल्याने त्यांनी महापौरपदाच्या शर्यतीतून काढता पाय घेतला. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांकडे इच्छुक उमेदवार होते. मात्र पक्ष श्रेष्ठींनी शिवसेनेच्या पारड्यात महापौरपद टाकले. महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसले तरी शिवसेना हा महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना काय निर्णय घेते हेही महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.