Karad NCP News : भरती प्रक्रियेतील काळाबाजार बाहेर काढणार : रोहित पवार यांचा इशारा

Rohit Pawar आमदार रोहित पवार यांनी कऱ्हाडला पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील विविध भरती प्रक्रियेवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली..
Rohit Pawar, Eknath Shinde
Rohit Pawar, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Karad NCP News : तलाठी भरतीसह इतर सर्व भरती प्रक्रियेत काळाबाजार सुरु असून सरकार मुद्दामहून खासगी कंपनीकडून ही प्रक्रिया राबवत आहे. या भरतीचा पेपर अनेक वेळा फुटलेला असूनही चुकीचे घडूनही त्याची पाठराखण ह सरकार करत आहे यामध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीतील काळाबाजारा विरोधात आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

कोल्हापुर दौऱ्यावर जाण्यापुर्वी आमदार रोहित पवार Rohit Pawar कऱ्हाड (जि.सातारा) येथे Karad काहीकाळ थांबले हाोते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक सौरभ पाटील, समीर कुडची, संजय पिसाळ यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध भरती प्रक्रियेवरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.

सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये काळाबाजार सुरु आहे. सरकार मुद्दाहुन खाजगी कंपन्यांकडून भरती करत आहे. पेपर अनेक वेळा फुटलेले आहेत. त्यामध्ये एफआयआर दाखल होवुनही सरकार उलट पेपर कुठं फुटलाय असे म्हणत आहे. कुठेतरी चुकीचं घडतंय आणि त्याची पाठराखण सरकार करतंय.

सामान्य युवकांच्या जीवावर सरकार राजकारण करत आहे. पुढच्या काही दिवसात यामध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीत जो काही काळाबाजार चालला आहे. या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

Edited By : Umesh Bambare

Rohit Pawar, Eknath Shinde
Satara Congress News : चोऱ्या लपविण्यासाठी शिंदे, पवार गट सत्तेत गेला : पृथ्वीराज चव्हाणांचा घाणाघात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com