Karad Politic's : कराडला लागणार सातारा Dcc बॅंकेच्या अध्यक्षपदाची लॉटरी? : आमदार भोसले अन्‌ उंडाळकरांची नावे चर्चेत

Satara Dcc Bank Chairman Election 2026 : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी कराडमधून आमदार डॉ. अतुल भोसले आणि राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची नावे चर्चेत आहेत. महायुतीतील राजकीय समीकरणांमुळे निवडीकडे लक्ष लागले आहे.
Udaysinh Patil Undalkar-Atul Bhosale
Udaysinh Patil Undalkar-Atul BhosaleSarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara, 15 November : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही कराडला सत्तेच्या राजकारणामुळे अध्यक्षपदाने हुलकावणी दिली होती, त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाची लॉटरी कराडला लागणार का, याची चर्चा रंगली आहे. महायुतीत पहिल्यांदा अध्यक्षपद भाजपकडे आल्यास आणि पक्षांतर्गत शह-कटशहाच्या राजकारणात आमदार डॉ अतुल भोसले यांना संधी मिळू शकते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे नावही चर्चेत आहे, त्यामुळे डीसीसी बॅंकेच्या अध्यक्षपदाची माळ भोसले यांच्या की उंडाळकर यांच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या बुधवारी (ता. १५ नोव्हेंबर) होणार आहे. महायुतीने एकत्रितपणे ही निवडणूक लढवली असली तरी सहकारी सोसायटी मतदारसंघ आणि काही राखीव जागांवर महायुतीमधीलच शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांतच रस्सीखेच झाली. भाजप ९ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या ८ आणि शिवसेनेच्या ४ जागांमुळे भाजपला या दोन्ही मित्रांना सोबत घेऊन जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष ठरवावा लागणार आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी सध्या भाजपकडून मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवेंद्रराजे भोसलेंचे विश्वासू चंद्रकांत जाधव व ज्ञानदेव रांजणे यांची नावे चर्चेत आहेत. भाजप नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून अंतर्गत संघर्ष झाला तर कराडचे आमदार अतुल भोसले यांना संधी मिळू शकते.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कराडचे ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. यामध्ये मंत्री असलेल्या मकरंदआबांनी नकार दिल्यास जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची माळ ॲड उंडाळकर पाटील यांच्या गळ्यात पडू शकते.

Udaysinh Patil Undalkar-Atul Bhosale
Satara Dcc Bank Chairman : सातारा Dcc बॅंकेच्या अध्यक्षपदाबाबत गोरेंनी पुन्हा ठणकावलं; म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नीट अन्‌ क्लिअर ठरलंय...

कराड तालुक्यातून भाजपचे सर्वाधिक ८ जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. ओबीसी प्रवर्गातील दोन महिला सदस्यांचा त्यामध्ये समावेश होता. मात्र, सत्तेच्या राजकारणात कराडला अध्यक्षपदाने हुलकावणी दिली. अध्यक्षपदासोबतच सभापतिपदसुद्धा कराडला मिळू शकले नाही.

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये सध्या कुरबुरी सुरू आहेत. भाजप (०९) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (०८) संख्याबळात केवळ एका जागेचा फरक आहे. तसेच, जिल्हा परिषद निवडणुकीपासून जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना सर्वार्थाने एकत्र आहे. त्यामुळे चार जागा जिंकलेली शिवसेना राष्ट्रवादीला अध्यक्षपदासाठी पाठिंबा देऊ शकते. मात्र, महायुतीचे वरिष्ठ नेते अध्यक्षपदाबाबत मध्यम मार्गी काढण्याची शक्यता आहे.

Udaysinh Patil Undalkar-Atul Bhosale
Ranjitsinh Mohite Patil : मोहिते पाटलांनी ओळखला होता धोका; DCCसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सहकारमंत्र्यांना लिहिले होते पत्र

कराडमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे तीन संचालक निवडून आले आहेत. यात राष्ट्रवादीचे दोन, तर भाजपच्या एका संचालकाचा समावेश आहे. भाजप आमदार डॉ अतुल भोसले आणि राष्ट्रवादीकडून ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर आणि ऋतुजा राजेश पाटील वाठारकर यांचा समावेश आहे, त्यामुळे कराड आता तरी अध्यक्षपदाची संधी मिळणार का, याची उत्सुकता संपूर्ण तालुक्याला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Jaykumar Gore-shivendra raje bhosale-shambhuraj desai
Udaysinh Patil Undalkar-Shambhuraj Desai
Shivendraraje Bhosale
Adv. Udaysinh Patil Undalkar-Anandrao Patil