Solapur Politics: दत्तामामांच्या 'डॅमेज कंट्रोल'कडे पाठ फिरवून यशवंत मानेंची स्वतंत्र बैठक : कार्यकर्त्यांना भाजप प्रवेशाचा मुहूर्तच सांगितला!

Yashwant Mane BJP entry: सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पडझड रोखण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भरणे यांनी मंगळवारी (ता. 21 ऑक्टोबर) रोजी सोलापूरमध्ये बैठक घेतली. या बैठकीकडे माजी आमदार यशवंत माने यांनी पाठ फिरवली.
Yashwant Mane Dattatray Bharne BJP .jpg
Yashwant Mane Dattatray Bharne BJP .jpgSarkarnama
Published on
Updated on

Solapur News: सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील पडझड रोखण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भरणे यांनी मंगळवारी (ता. 21 ऑक्टोबर) रोजी सोलापूरमध्ये बैठक घेतली. या बैठकीकडे माजी आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांनी पाठ फिरवली. या बैठकीऐवजी त्यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावातील कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक नान्नज येथे घेतली. यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी माने यांनी दिवाळीनंतर जाहीररित्या भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले.

यशवंत माने म्हणाले, कार्यकर्त्यांच्या हितासाठी सर्वसामान्य लोकांची विकास कामे होण्यासाठी आपण भाजपमध्ये पक्ष प्रवेश करीत असून कार्यकर्त्यांना कुठलीही उणीव भासू देणार नाही. मी आमदार असताना पाणंद रस्त्याची मंजूर केलेली कामे अद्याप झालेली नाहीत. किचकट नियम तसेच विरोधकांकडून माहिती अधिकार वापरून कामे करताना होणारा अडथळा या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावांमध्ये सर्व पानंदरस्त्याची कामे स्व खर्चातून करून देणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

येणाऱ्या 1 नोव्हेंबरपासून ही कामे सुरू करणार आहे. संबंधित काम करताना मुरूम उचलण्यासाठी तहसीलकडून रीतसर परवानगी घ्यायची आहे. परवानगी मिळताच त्या ठिकाणी एक पोकलेन, तीन डंपर, एक ट्रॅक्टर व एक रोडरोलर अशी यंत्रणा स्वखर्चातून देणार आहे. यामुळे वाड्यावर राहणाऱ्या शेतकऱ्यांची सोय होणार आहे, असेही यशवंत माने यांनी सांगितले.

यावेळी यावेळी बाजार समिती संचालक अविनाश मार्तंडे, नान्नजचे सुनील भोसले यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यात यशवंत माने हाच आमचा पक्ष असा सूर कार्यकर्त्यांनी आळवला.

Yashwant Mane Dattatray Bharne BJP .jpg
Nashik Politics : संदीप कर्णिक इफेक्ट! इच्छुक म्हणतात, 'यंदा होर्डिंग नको रे बाप्पा', शहरानेही घेतला मोकळा श्वास!

अकोलेकाटी येथील सैन्य दलातील जवान नामदेव लामकाने यांनी शेत रस्त्याची समस्या मांडली. यासंदर्भात विद्यमान आमदार यांच्याकडे रीतसर रस्ता करण्यासाठी निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी त्यामध्ये राजकारण आणून "तुम्ही आम्हाला मतदान केले नाही तुम्ही जाऊ शकता" अशा शब्दात फटकारले अशी माहिती नामदेव लामकाने यांनी दिली.

या रस्त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची सोय होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी या बैठकीत मांडली. त्यावेळी माजी आमदार यशवंत माने यांनी तुम्ही मुरूम उपसा संदर्भात तहसील कार्यालयाकडून परवानगी प्रक्रिया पार पाडा. तात्काळ अकोलेकाटी येथील शेत रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन माजी आमदार यांनी दिले.

Yashwant Mane Dattatray Bharne BJP .jpg
Maval News: ‘मामा-भाचा ’एकत्र! मावळमध्ये राजकीय समीकरणांना मिळणार नवी दिशा

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची व्यव्हूरचना सध्या आखण्यात येत आहे. लवकरच भाजप (BJP) प्रवेशानंतर माजी आमदार दिलीप माने, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य शहाजी पवार यांच्याशी चर्चा करून वाटाघाटी करण्यात येणार आहेत. वाट्याला येणाऱ्या जागा निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावॆ. असे आवाहन माजी आमदार यशवंत माने यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com