Udayanraje Bhosale : मनोज जरांगेंना उदयनराजे भोसलेंचे बळ; साताऱ्यात नेमकं काय घडलं ?

Manoj Jarange Patil In Satara : ओबीसी नेत्यांना जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत
Udayanraje Bhosale, Manoj Jarange
Udayanraje Bhosale, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांविरोधात सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले आहेत. त्यांनी जरांगेंनी आंदोलनाची सुरुवात केली, त्या अंबड येथूनच मराठ्यांना कुणबी दाखले देण्यास विरोध केला. या वेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतर नेत्यांवर जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. त्यांच्याविरोधात जरांगे एकटेच लढताना दिसले. अशा स्थितीत सातारा येथे गेलेल्या जरांगेंना खासदार उदयनराजे भोसले यांनी बळ दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिवारी सातारा येथील मराठा समाजातील लोकांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या वेळी उदयनराजे यांनी जरांगेंना लढण्याचे प्रतीक असलेली तलवार भेट देली. ही तलवार देत त्यांना उदयनराजेंनी एकप्रकारे लढण्याचे बळ दिल्याची चर्चा आहे. तसेच जरांगे पाटलांना कानमंत्रही दिला.

Udayanraje Bhosale, Manoj Jarange
OBC Vs Maratha : 'ओबीसींचा एल्गार अभी बाकी है !' प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा

यावर जरांगे पाटील म्हणाले, 'महाराष्ट्राचे दैवत शिवरायांचे वंशज असलेले उदयनराजे यांनी पाठीवर हात ठेवून लढण्याची ताकद दिली आहे. त्यांच्या कानमंत्राने लढण्यास बळ मिळाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देण्यासाठी माझा आत्मविश्वास वाढला आहे. यातूनच समाजाला आरक्षण मिळवून देणारच,' अशा विश्वासही जरांगे पाटलांनी या वेळी व्यक्त केला.

दरम्यान, अंबड येथील ओबीसी एल्गार सभेतून मंत्री भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अपवाद वगळता मराठा नेते जरांगेंची पाठराखण करताना दिसले नाहीत. अशास्थितीत उदयनराजेंनी जरांगेंच्या पाठीवर थाप देत तलवार भेट दिल्याची चर्चा रंगली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Udayanraje Bhosale, Manoj Jarange
Satara Maratha Reservation : कुणबी शब्दाची लाज वाटते; शेती विकून चंद्रावर जावा...जरांगे पाटलांचा सल्ला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com