Shashikant Shinde target Shinde-Fadanvis: तुम्ही माझं घर फोडलं, मी तुमची...; शशिकांत शिंदेंचा शिंदे-फडणवीसांना इशारा

Satara Politics: शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी सोमवारी (६ जून) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला.
Shashikant Shinde Criticized Shinde-Fadanvis:
Shashikant Shinde Criticized Shinde-Fadanvis: Sarkarnama

Shashikant Shinde target Shinde-Fadanvis News: 'तुम्ही माझे घर फोडले.. मी ही शिंदे - फडणवीस युती तोडण्यासाठी रान तापवणार, पण आमच्या प्रयत्नांपेक्षा शिंदे-फडणवीसांचा मंत्रिमंडळ विस्ताराच त्यांचे सरकार पडायला कारणीभूत ठरेल, अशी संतप्त प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी दिली आहे.

जावळी तालुक्याचे नेते व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी सोमवारी (६ जून) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपलं घर फोडल्याचे दु:ख शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. इतकेच नव्हे तर तुम्ही माझं घर फोडलं, मी तुमची युती तोडणार, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

Shashikant Shinde Criticized Shinde-Fadanvis:
Satara Politics: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का; बंधू ऋषिकांत शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश

राज्य सरकारमधील बरेच लोकं नाराज आहेत आणि त्यामुळे आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काहीच प्रयत्न करावा लागणार नाही, अशीही परिस्थिती येऊ शकते. कारण तुम्ही आमच्याकडे या सरकार बनवू असे सांगताना 50 खोक्याबरोबच अनेक आमिषे दाखविली गेली होती. ती जर पूर्ण झाली नाहीत तर त्याचा फटका देखील या सरकारकला बसू शकतो. त्यामुळे आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करायची गरजच पडणार नाही, असेही शशिकांत शिंदेंनी म्हटलं आहे. (Shinde-Fadanvis Politics)

याचवेळी, तुम्ही माझं घर फोडलं त्या भाजप आणि शिंदेची ही युती संपवण्याचे मी आव्हान स्वीकारल आहे. माझ्यापरीने या युतीविरोधात रान तापवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचा इशाराही शशिकांत शिंदेंनी दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com