
Solapur, 17 August : मी सोलापूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पालकमंत्री आणि तुम्हा सर्वांना सांगतो की, आयटी पार्कसाठी उत्तम जागा शोधून काढा. मी एमआयडीसीच्या माध्यमातून तुम्हाला आयटी पार्कची उभारणी करून देईल. आपण आयटी कंपन्यांनाही सोलापूरमध्ये घेऊन येऊ, जेणेकरून येथे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे येथील 1345 सदनिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांची आयटी पार्कची मागणी पूर्ण करण्यात येईल. पण त्यासाठी जागा शोधण्याचे आवाहन केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आमच्याकडे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे, अशी मागणी आपण केली. आज आपण पुण्यातील आयटी पार्कमध्ये गेलात आणि सोलापूरकर किती म्हणालात तर अर्धे हात वर करतात. सगळे सोलापूरकरच आहेत, तिकडे आहेत. तीच आयटी पार्कची व्यवस्था आपण सोलापूरमध्ये (Solapur) उभी केली तर आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू.
इंडस्ट्रीज ही कनेक्टिव्हिटीने येते. आज एअरपोर्टचं काम झालं आहे आणि त्या एअरपोर्टवर फ्लाइट यायला लागले आहेत. रस्त्यांची कनेक्टिव्हिटी चांगली झालेली आहे. या सगळ्या कनेक्टिव्हिटीमुळे आपली ही एकेकाळाची औद्योगिक नगरी आहे. या नगरीला पुन्हा भरभराटी कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. महाराष्ट्राचे सरकार हे सोलापूरच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, तुम्ही काळजी करू नका, असेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, आज आपण राज्यात 1 लाख 52 हजार उद्योजक उभे केले आहेत, तसेच 13 हजार कोटी रुपये आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. आज आपण या तरुणांना मागणाऱ्याच्या भूमिकेत नाही, तर देणाऱ्यांच्या भूमिकेत आणलं आहे.
देशाला नवी दिशा देणारा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ गृहनिर्माण प्रकल्प साकार होतो आहे, याचा मला आनंद आहे. या प्रकल्पासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांना धन्यवाद देऊ इच्छितो. रे-नगरचा प्रकल्प सोलापुरात सुरू होता, तेव्हा मी विजयकुमार देशमुख यांना असाच एक प्रकल्प करण्याचं सुचवलं आणि आता हा प्रकल्प साकार होतो आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
जवळजवळ अर्धा भारत (40 टक्के) निवाराविना होता, तेव्हा नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. भार्थ्याला अत्यंत कमी दरात हे घर मिळत आहे कारण भाड्याच्या घराला जेवढं भाडं द्यावा लागतं. तेवढाच हफ्ता आता या घराला द्यावा लागणार आहे. पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पसाठी 1 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, आपण 30 लाख घरं मागितली होती आणि मोदींनी 30 लाख घरे आपल्याला देत आहेत. ग्रामविकास विभागाचे अभिनंदन करतो, कारण पहिल्या 15 लाख घरांच्या कामाची सुरुवात त्यांनी केली आहे. पुढील दोन वर्षांत 30 लाख लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर मोदींमुळे मिळणार आहे.
महाराष्ट्र हे पहिलं राज्य आपणाला बनवायचं आहे, जे 'बेघर मुक्त राज्य' आपणाला करायचं आहे. प्रत्येक घरावर आम्ही सोलार लावणार असून या 30 लाख घरातील लोकांना विजेचा एक रुपयासुद्धा बिल द्यावे लागणार नाही, त्या सर्वांना मोफत वीज मिळणार आहे. चांगल्या पद्धतीच्या हौसिंग सोसायट्या बांधून सोलापूरने महाराष्ट्राला एक उदाहरणं निर्माण करून दिले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.