Kolhapur News : राष्ट्रवादीच्या कालच्या निर्धार सभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांना टार्गेट करून गद्दारांना कोल्हापुरी पायताण दाखवा, असे वक्तव्य केले होते. त्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाड यांना त्याच सडतोड शब्दातं प्रत्युत्तर दिले आहे. "अशी भाषा करायची असेल तर आव्हाड यांना सांगावं लागेल की, कोल्हापुरात चप्पल नाही तर कापशीचं पायताण प्रसिद्ध आहे आणि ते करकर वाजतयं. ते बसलकी कळेल, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी जितेंद्र आव्हाडांना थेट इशाराच दिला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, आम्ही अजितदादा सोबत का गेलो? हे याआधीही आम्ही सांगितलं आहे. पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही निर्णय घेतला असून हा आमचा सामूहिक निर्णय आहे. याबाबत आम्ही चर्चा आमच्या दैवत ( राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार) झाल्या होत्या. पण, कालच्या सभेत माझ्यावर टीका करणारे स्थानिक नेते अतृप्त आत्मे आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा पक्ष आहे. असेही मुश्रीफांनी नमुद केले.
शरद पवारांवर जितेंद्र आव्हाड यांनी काय जादू केली मला माहित नाही. पण त्यांनी ठाण्यात संपूर्ण राष्ट्रवादी पक्षच संपवला, असा आरोपही मुश्रीफ यांनी यावेळी केला. तसेच. त्यांनी अशी भाषा बोलायला नको होती, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
इतकेच नव्हे तर, एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी पाठिंबाचे पत्र दिल्याचा गौप्यस्फोटही मुश्रीफ यांनी यावेळी केला. त्या पत्रावर जितेंद्र आव्हाड यांचीदेखील सही होती. गृहनिर्माण खातं आव्हाड हृदयाला कवटाळून बसले होते. त्यावेळी कुठे गेला होता राधा तुझा धर्म? असा टोलाही मुश्रीफांनी यावेळी लगावला.
याचवेळी त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर मात्र मुश्रीफांनी बोलायला नकार दिला. सत्तेत सहभागी होण्याआधी न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला आहे. त्यावेळी देखील इतरांसारखी सहानुभूती आम्हाला मिळाली नाही. अशी खंत ही मुश्रीफांनी बोलून दाखवली.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.