Ajit Pawar Baramati Visit : राष्ट्रवादीतील बंडानंतर अजितदादा प्रथमच होमपिचवर; बारामती लोकसभेवर बोलणार का? याकडे राज्याचे लक्ष

Ajit Pawar News : आता अजित पवार गट लोकसभेला सुळे यांच्या विरोधात उमेदवणार देणार का, याची चर्चा होत आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिवसेना-भाजप युती सरकारसोबत जाऊन उपमुख्यमंत्री बनलेले अजित पवार आज आपल्या ‘होम ग्राउंड’वर येत आहेत. ते काय बोलणार आणि कुणावर निशाणा साधणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी सुरू असलेल्या गोंधळावर भाष्य करणार का? हेही पाहावे लागणार आहे. (Ajit Pawar will visit Baramati today for first time after becoming Deputy CM)

बारामतीत आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागरी सत्कार होणार आहे. अजितदादा समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. सुपे येथील पोलिस चौकीच्या उद्‌घाटनाने अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याची सुरुवात होणार आहे, त्यानंतर ते मोरगावच्या मयूरेश्वराला अभिषेक करणार आहेत. मयूरेश्वराच्या दर्शनानंतर ते माळेगावच्या पोलिस चौकीचे उद्‌घाटन करतील. बारामती शहरात त्यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. शारदा प्रांगणात सायंकाळी त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे.

Ajit Pawar
Rohit Pawar Appeal To Kolhapurkar : ‘कोल्हापूरकरांनी ठरवलं की ते करूनच दाखवतात....खटक्यावर बोट अन्‌ जागेवर पलटी’

अजित पवार आणि त्यांच्यासोबत ३५ ते ४० आमदारांनी बंड करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. खुद्द बारामतीत काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. कारण, बारामती लोकसभेच्या खासदार ह्या सुप्रिया सुळे आहेत. आता अजित पवार गट लोकसभेला सुळे यांच्या विरोधात उमेदवणार देणार का, याची चर्चा होत आहे.

Ajit Pawar
NCP Letter Against Ajitdada Group अजितदादा गटाचे ९ आमदार अन्‌ २ खासदारांविरोधात राष्ट्रवादीची तक्रार; विधानसभा अध्यक्ष, लोकसभा सभापतींना पत्र

मुळात आजच्या सभेत अजित पवार हे भाजपसोबत जाण्यामागची भूमिका विशद करण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर बोलणार का, याचीही उत्सुकता पुणेकरांना असणार आहे. या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सत्कार समारंभासाठी उभारण्यात आलेला स्टेज हे आहे.

Ajit Pawar
Satyajeet Tambe Allegation : टार्गेट करून मला काँग्रेसमधून बाहेर ढकललं, पण ‘ती’ जबाबदारी पक्षश्रेष्ठींची; सत्यजित तांबेंनी सांगितली आपबिती

अजित पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश सर्व स्थानिक नेते आहेत. अगदी तालुकाध्यक्षापासून दूध संघाच्या अध्यक्षांपर्यंत सर्वजण अजितदादांसोबत असणार आहेत. कारण, बारामतीचे सर्व राजकारण अजितदादांच्या हाती हेाते. बारामतीबाबतचे सर्व डावपेच आणि रणनीती हे तेच ठरवायचे, त्यामुळे बारामतीत अजितदादांचे जंगी स्वागत होणार, हे निश्चित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com