
Satara, 26 April : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्यात 28 पर्यटकांना जीव गमवावा लागल्याने देशभरात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. वाई तालुक्यातील जांभळी येथील तरुणास मोबाईल स्टेट्सवर पाकिस्तानचा झेंडा ठेवणे महागात पडले आहे. भारताविरोधी मजूकर आणि पाकिस्तानचा झेंडा मोबाईलवर स्टेट्स ठेवल्याने वाई पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
शुभम दशरथ कांबळे (वय 23, रा. जांभळी, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संकेत सुरेश चिकणे (रा. सोनगिरवाडी, ता. वाई) यांनी फिर्याद दिली होती. वाई पाेलिसांनी (Wai Police) शुभभ कांबळे ह्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्यात देशभरातील 28 पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत, तर 22 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी भारताने पाकिस्तानचे (Pakistan) सिंधू नदीचे पाणी रोखले आहे. तसेच, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे सरकारने दहशतावाद्यांचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानाला हिसका दाखवलेला असताना देशात पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांना आम्ही सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियातून वादग्रस्त पोस्ट व्हायरल होत आहे. जातीय तेढ आणि धार्मिक भावना दुखावण्याचे काम केले जात आहे, त्यातून सामाजिक वातावरण दूषित केले जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांवर करड नजर ठेवली जात आहे. त्यातूनच पोलिसांनी वाई येथील शुभम कांबळे या तरुणावर कारवाई केली आहे. तसेच, वादग्रस्त आणि तणाव वाढविणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
शुभम कांबळे याने पाकिस्तानचा झेंडा आणि भारताविरोधी मजकूर आपल्या मोबाईल स्टेट्सवर ठेवला होता. हे त्याचा मित्र संकेत चिकणे याने गुरुवारी (ता. २४ एप्रिल) पाहिले होते. संकेत चिकणे याने याबाबतची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार, शुभम कांबळेवर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी केलेल्या तपासात शुभम कांबळे याने आपल्या मोबाईलवर वादग्रस्त स्टेट्स ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर शुकवारी पोलिसांनी शुभम कांबळे याला अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.