Mangalvedha ZP Election : मंगळवेढ्यात मातब्बरांना अनुकूल आरक्षण; दामाजीनगरमधील विजयी उमेदवार ठरणार झेडपी अध्यक्षपदाचा दावेदार

Solapur ZP reservation : मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांचे आरक्षण जाहीर झाले आहे. भोसे गट खुला राहिल्याने चुरस वाढली असून दामाजीनगर गटातून अध्यक्षपदाची शक्यता आहे.
Mangalvedha ZP Election
Mangalvedha ZP ElectionSarkarnama
Published on
Updated on
  1. मंगळवेढा तालुक्यातील चार गटांचे आरक्षण जाहीर झाले असून, दामाजीनगर ओबीसीसाठी, हुलजंती सर्वसाधारण महिला, लक्ष्मी दहिवडी अनुसूचित जाती महिला आणि भोसे सर्वसाधारण गट म्हणून राखीव झाले आहेत.

  2. दामाजीनगर गटातून विजयी उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दावेदार ठरू शकतो, त्यामुळे या गटावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

  3. भोसे गट खुला राहिल्याने येथे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अनिल सावंत, बसवराज पाटील आदींमध्ये तीव्र चुरस अपेक्षित आहे.

Mangalvedha, 13 October : मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार गटांचे आरक्षण जाहीर झाले आहे. तालुक्यातील अनेक मातब्बरांना हे आरक्षण अनुकूल ठरल्याचे सांगितले जात आहे. भोसे गट पुन्हा एकदा खुला राहिल्याने या ठिकाणी तुल्यबळ लढत पाहायला मिळू शकते. दामाजीनगर गटातून निवडून येणारा उमेदवार हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दावेदार ठरू शकतो.

मंगळवेढा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडत सोलापूर येथे नियोजन भवनात काढण्यात आली. दामाजीनगर गट हा यापूर्वी खुला होता. तो आता इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित झाला आहे, त्यामुळे या ठिकाणी नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकते.

दामाजी नगर गटातून श्री दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, महावीर ठेंगील, लाडीक डोके, रमेश भांजे हे प्रमुख दावेदार मानले जातात. यांच्याशिवाय एखादा नवीन चेहराही निवडणुकीच्या आखाड्यात येऊ शकतो. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे या गटातून विजयी होणारा उमदेवार हा अध्यक्षपदासाठी दावेदार ठरू शकतो.

हुलजंती जिल्हा परिषद गट हा यापूर्वी अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित होता. या गटातून निवडून आलेल्या शिला शिवशरण यांनी समाज कल्याण सभापती म्हणून चांगले काम केले आहे. त्यामुळे त्या पुन्हा या गटातून इच्छूक आहेत. मात्र, हा गट आता सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. संगीता दुधाळ यांनीही या गटातून दावेदारी केली आहे.

हुलजंती गटातून हनुमंत दुधाळ आणि प्रदीप खांडेकर यांनीही मोर्चेबांधणी केली होती. मतदारांशी संपर्क साधण्यामध्ये ते दोघेही आघाडीवर होते आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्वच पातळीवर आघाडी असलेले दुधाळ आणि खांडेकर यांना महिला आरक्षणामुळे थांबावे लागणार आहे. पर्यायाने महिलेला संधी देण्याची वेळ आली. राष्ट्रवादीकडून लतीफ तांबोळी यांची कन्या ॲड सुमैय्या तांबोळी यांचीही उमेदवार येऊ शकते.

Mangalvedha ZP Election
Solapur ZP Reservation : बळीराम साठेंचे स्वप्न भंगले; उमेश पाटलांना पुन्हा संधी, कुर्डूत शिंदे कुटुंबातील उमेदवार कोण?

भोसे जिल्हा परिषद गट यापूर्वी खुला होता आणि तो यावेळीही खुला राहिला आहे. या गटातून निवडून आलेले दिलीप चव्हाण यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. मागील पंचवार्षिकमध्ये केलेल्या कामाच्या जोरावर या गटातून तेही दावेदार होऊ शकतात. याच गटातून यापूर्वी भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांनीही झेडपीची जोरदार तयारी केलेली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभावामुळे ते पुन्हा जिल्हा परिषदेसाठी दावेदारी करू शकतात. याशिवाय दामाजी कारखान्याचे संचालक बसवराज पाटील, पंचायत समितीचे सदस्य नितीन पाटील, तानाजी काकडे, गुलाब थोरबोले, रविकिरण कोळेकर, सुहास पवार, मनोज खांडेकर हेही या गटातून इच्छुक आहेत.

ओबीसी महिलेसाठी यापूर्वी आरक्षित असलेला लक्ष्मी दहिवडी गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे, त्यामुळे या गटात एससी महिला उमेदवार शोधताना नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या गटातून मारापूरचे सरपंच विनायक यादव व पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी गावकरे इच्छूक होते, मात्र या गटात सर्वाधिक लोकसंख्या अनुसूचित जातीची असल्याने अनुसूचित जाती महिलेसाठी तो राखीव झाला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती शीला शिवशरण यांची उमेदवारी येथून येऊ शकते. मात्र त्यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

जिल्हा परिषद आरक्षण सोडतीमध्ये अनेकांना झटका बसला आहे. सध्याच्या आरक्षणामुळे दामाजी नगर आणि भोसे जिल्हा परिषद गटाची निवडणूक जिल्ह्यात लक्षवेधक ठरणार आहे. जिल्हा परिषदेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना त्याच्या गणातील पंचायत समितीचे उमेदवारही प्रबळ द्यावे लागणार आहेत, त्यांच्या ताकदीच्या फायदा जिल्हा पदिषदेच्या उमेदवारांनाही होऊ शकतो.

जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

संत दामाजीनगर : ओबीसी

हुलजंती : सर्वसाधारण महिला

लक्ष्मी दहिवडी : अनुसूचित जाती महिला

भोसे : सर्वसाधारण

Mangalvedha ZP Election
Chhagan Bhujbal : मी फार फार तर मोदीसाहेबांकडे जाईल, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन भुजबळांचे मोठे विधान

प्रश्न 1 : मंगळवेढा तालुक्यात किती जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर झाले?
एकूण चार गटांचे आरक्षण जाहीर झाले आहे.

प्रश्न 2 : कोणता गट जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महत्त्वाचा मानला जात आहे?
संत दामाजीनगर गट, कारण तो ओबीसीसाठी राखीव असून विजयी उमेदवार अध्यक्षपदासाठी दावेदार ठरू शकतो.

प्रश्न 3 : कोणता गट खुला राहिला आहे?
भोसे गट पुन्हा एकदा सर्वसाधारण (खुला) राहिला आहे.

प्रश्न 4 : लक्ष्मी दहिवडी गट कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे?
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com