MLC Election : वळसे पाटील ते संजय खोडके... डझनभर PA झालेत कारभारी; मिळालीय आमदारकीची संधी!

MLC Election News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी आज (17 मार्च) संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच ते आमदार झाल्यात जमा आहे.
Sharad Pawar, Gopinath Munde, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Gopinath Munde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

MLC Election News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी आज (17 मार्च) संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच ते आमदार झाल्यात जमा आहे. अर्जाची छाननी होणे आणि त्यांचा अर्ज वैध ठरणे एवढीच औपचारिकता आता शिल्लक आहे. ही औपचारिकता होताच राज्याच्या राजकारणात आणखी एका नेत्याचे स्वीय सहाय्यक स्वत: आमदार म्हणून वावरताना दिसणार आहेत.

संजय खोडके आधी मंत्रालयात कार्यरत होते. उपमुख्यमंत्री असताना छगन भुजबळ, आर.आर. पाटील यांचे ते स्वीय सहायक, विशेष कार्य अधिकारी होते. नंतर त्यांनी नोकरीच राजीनामा दिला आणि राजकारणात सक्रिय झाले. अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू झाले. त्यांची सावली म्हणून वावरु लागले. खोडके यांच्या पत्नीही तीन टर्मच्या आमदार आहेत.

याशिवायही महाराष्ट्रात अशी अनेक उदाहरण सांगता येतील जे कधी काळी आमदार, खासदार, मंत्री यांचे स्वीय सहाय्यक होते आणि जे पुढे जाऊन स्वत:च आमदार आणि खासदार झाले.

यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी काम केले होते. कालांतराने पवार यांनी त्यांना राजकारणात आणले. आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष केले. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून अमित साटम यांनी काम केले आहे. ते आज सलग तिसऱ्यांदा आमदार आहेत.

पहिल्या युती सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेल्या महादेवराव शिवणकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सुबोध मोहिते यांनी काम पाहिले होते. कालांतराने ते रामटेकमधून शिवसेनेचे दोनवेळा खासदार झाले. केंद्रात मंत्रीही झाले. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेले राम कदम यांची आता आमदारकीची चौथी टर्म सुरू आहे.

Sharad Pawar, Gopinath Munde, Devendra Fadnavis
Vidhan Parishad Election 2025 : बायकोनंतर नवराही होणार आमदार; अजितदादांनी उमेदवारी दिलेले संजय खोडके कोण?

माजी आमदार संतोष चौधरी यांनी 2009 मध्ये भुसावळ मतदारसंघ राखीव झाल्यानंतर स्वीय सहायक असलेल्या संजय सावकारे यांना उमेदवारी दिली, त्यांना आमदार केले. ते पुढे मंत्रीही झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आपल्या तब्बल तीन स्वीय सहाय्यकांना आमदार केले आहे. यात पहिले येतात अभिमन्यू पवार. 2019 आणि 2024 असे सलग दोनवेळा ते औसा मतदारसंघातून आमदार झाले आहेत.

याशिवाय अमरावतीच्या श्रीकांत भारतीय यांना गतवर्षी विधान परिषदेवर निवडून दिले आहे. सुमीत वानखेडे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आर्वी मतदारसंघातून तिकीट दिले होते. तेही विजयी होत आमदार झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक असलेले मिलींद नार्वेकर हेही 2024 मध्ये विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले.

Sharad Pawar, Gopinath Munde, Devendra Fadnavis
BJP : अवघ्या वर्षभराची आमदारकी... केचे अन् केनेकरांना खूश केलं की तोंडाला पाने पुसली?

माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या विनोद शेलार यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव असलेले सनदी अधिकारी बालाजी खतगावकर यांनी राजीनामा देऊन नांदेडमधील मुखेड मतदारसंघातून लढण्याची तयारी केली होती. शिंदे यांचे दुसरे विश्वासू ओएसडी मंगेश चिवटे हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com