Raj Thackeray Meet PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी-राज ठाकरेंची दिल्लीत भेट, कारण काय?

Narendra Modi Raj Thackeray : दिल्लीमध्ये एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती आहे.
Raj Thackeray - Narendra Modi
Raj Thackeray - Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट झालेचे वृत्त समोर आले आहे. ही खासगी भेट नसल्याचे देखील सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्या मेव्हण्याचे लग्न दिल्लीतील हयात हॉटेलमध्ये झाला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी हे देखील उपस्थित होते. तेथेच राज ठाकरे यांची त्यांच्यासोबत भेट झाली.

दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुंबईत झालेल्या शेवटच्या प्रचारसभेत राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी मैदानावर एकत्र आले होते.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेत युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

लग्नसोहळ्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सुप्रीम कोर्टाचे जज, विविध पक्षाचे दिग्गज नेते देखील उपस्थित होते.

Raj Thackeray - Narendra Modi
Political Horoscope: महापालिका, झेडपीमध्ये सत्ताधारी पक्षांचा वरचष्मा; महायुतीसाठी अनुकूल स्थिती

राज ठाकरेंचा मराठीचा नारा...

आगामी महापालिकेसाठी राज ठाकरेंनी मराठीचा नारा दिला आहे. मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी असल्याचे त्यांनी म्हटले होते. एका केंद्रीय मंत्र्याने केलेल्या वक्तव्यानंतर त्यांनी मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Raj Thackeray - Narendra Modi
BMC Election : मुंबईत भाजपचा महापौर करण्याची जबाबदारी 144 जणांवर : महापालिकेसाठी महारथींची टीम तयार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com