Maharashtra Live Updates : राज ठाकरेंना आणखी एका उत्तर भारतीय खासदाराचं खुलं आव्हान

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Live Updates
Maharashtra Live UpdatesSarkarnama
Published on
Updated on

Raj thackeray News : राज ठाकरेंना दुबेंपाठोपाठ आणखी एका खासदाराचं खुलं आव्हान, म्हणाले, 'तुमच्यात हिंमत असेल तर…'

राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असतानाच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधुंना खुले आव्हान दिले. तसेच त्यांच्यावर जोरदार टीका करताना त्यांना गुंड असे म्हणाले होते. यानंतर राज्यात याचे पडसाद होते. त्यानंतर आता आणखी एका खासदाराने राज ठाकरे यांना थेट आव्हान देत हिंमत असेल तर हिंदी सिनेसृष्टीला महाराष्ट्राच्या बाहेर काढून दाखवा, असे म्हटलं आहे. तर या खासदाराचे नाव राजीव राय असे असून ते समाजवादी पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्या या खुल्या आव्हानानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

latur farmers news : बैलाऐवजी स्वतःलाचं औताला जुंपले, आता जिल्हाधिकाऱ्यांनाच थेट नोटीस

लातूरमध्ये शेतीच्या मशागतीचा खर्च परवडेना म्हणून एका 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने स्वतःलाचं औताला जुंपले होते. यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली असून थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच नोटीस काढण्यात आली आहे. याबाबत आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या न्यायपीठाकडून जारी करण्यात आली आहे.

Mumbai railway flyover named sindoor News : आता मुंबईतील उड्डाण पुलाचे नाव 'सिंदूर'; 10 जुलैला लोकार्पण

पेहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव मगवावा लागला होता. त्याचा बदला भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानमध्ये घुसून घेतला. त्यासाठी ऑपरेश सिंदूर राबण्यात आले होते. आता मुंबईतील मशीद बंदर येथे रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या कर्नाक पुलाचे नाव बदलण्यात येणार आहे. या पुलाला सिंदूर हे नाव देण्यात येणार आहे.

Sharad Pawar News : शिक्षकांच्या मुंबईतील आंदोलनाला आता शरद पवार स्वतः जाणार

मुंबईतील आझाद मैदानात विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांनी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. शिक्षकांनी शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा म्हणजेच वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता तोडगा न निघाल्यास शरद पवार हे बुधवारी आंदोलकांची भेट घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com