Maharashtra Live Updates : बच्चू कडूंच्या आंदोलनास मनसेचा पाठिंबा, एम. फिल धारक प्राध्यापकांना दिलासा, आता तुकडा कायदाही रद्द

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Live Updates
Maharashtra Live Updatessarkarnama
Published on
Updated on

bacchu kadu satbara kora yatra protest : बच्चू कडूंच्या ‘सातबारा कोरा यात्रेत' मिळणार मनसेची धार; मनसेचे नेते बाळा नांदगावकर जाणार यवतमाळला

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी काढलेल्या ‘सातबारा कोरा यात्रे’ला मोठं पाठबळ मिळणार आहे. या लढ्यात कडूंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाठिंबा जहीर करण्यात आला असून गुरूवारी (ता.10) मनसेचे नेते बाळा नांदगावकर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लालखिंड येथे बच्चू कडू यांच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

M Phil Professors : एम. फिल धारक प्राध्यापकांना मोठा दिलासा; नेट/सेटमधून सूट

राज्यातील गेल्या 25 वर्षांपासून या अर्हतेचा लाभ मिळत नव्हता. पण आता विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.फिल पात्रता धारक प्राध्यापकांना दिलासा देणारा निर्णय घेतला असून दीर्घकाळ सेवेतील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल अर्हताधारक प्राध्यापकांना आता नेट/सेटमधून सूट दिली आहे. त्यानुसार, राज्यातील एक हजार 421 प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे.

Prime Minister Modi award News : पंतप्रधान मोदींना आणखी एका देशाच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान ब्राझीलचे राष्ट्रपती, महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी मंगळवारी (ता.8) केला होता. त्यांनी ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान असणाऱ्या द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसने सन्मानीत करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आज (ता.9) त्यांचा नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस' देखील सन्मान करण्यात आला.

Beed Crime News : सावकाराच्या छळाला कंटाळून बीडमधील कापड व्यापाऱ्याची आत्महत्या

बीड शहरात धक्कादायक घटना घडली असून सावकाराच्या जाचाला कंटाळून कापड व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना 10 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. मयत कापड व्यापाऱ्याचे नाव राम फटाले असून सावकार एक डॉक्टर आहे. त्याचे नाव लक्ष्मण जाधव असे आहे. दरम्यान सावकार आणि मयत यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या असून यात सावकाराने अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे.

Teacher protest successful News : शिक्षकांसमोर सरकार झुकलं, सर्व मागण्या मान्य; ‘या’ तारखेला पगार होणार

मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने या शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून तशी घोषणी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी केली आहे.

tukebandi kayda News : तुकडेबंदी कायदा रद्द होणार? महसूल मंत्र्यांची विधीमंडळात घोषणा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (ता.9) विधिमंडळात मोठी घोषणा करताना तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल असे जाहीर केले. यामुळे त्यांच्या या निर्णयाचे स्वागत विरोधकांनी देखील केले असून यामुळे 50 लाख हून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावा सरकारने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com