Pradeep Purnekar murder Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; कर्नाळा जंगलातून हस्तगत केलेली वस्तूच पोलिसांना 'मास्टरमाईंड'पर्यंत पोहोचवणार

Pradeep Purnekar murder case News : पोलिसांना मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यासाठी आरोपीकडून हस्तगत केलेले एक पिस्तूल या प्रकरणाच्या कडीचा उकल करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
Pradeep Purnekar  | Thane Crime Case
Pradeep Purnekar | Thane Crime CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News : ठाण्यातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानंतर शिवसैनिकांनी मोठे आंदोलन केले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडून या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध घेण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये पोलिसांना मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यासाठी आरोपीकडून कर्नाळा जंगलातून हस्तगत केलेले एक पिस्तूल या प्रकरणाच्या कडीचा उकल करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

पोलिसांनी (police) या प्रकरणात तातडीने पावले उचलत आरोपीना अटक केली आहे. आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यातच आता प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात महत्त्वपूर्ण घडामोड झाली असून, या प्रकरणातील मास्टरमाईंडचा शोध घेण्यासाठी पोलीस सध्या युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

पुणे पोलिसांनी या प्रकरणात आरोपींकडून एक पिस्तूल हस्तगत केले होते. या तपासात पिस्तूल ही एक महत्त्वाची कडी मानली जात आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणातील मास्टरमाईंडपर्यंत पोहचण्यासाठी ही वस्तू महत्वपूर्ण मानली जात आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस सध्या युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

Pradeep Purnekar  | Thane Crime Case
MVA Legislative Council Election : विधानपरिषदेसाठी आघाडीतील बिघाडी चव्हाटयावर; उद्या तोडगा निघणार की मैत्रीपूर्ण लढत? उत्सुकता शिगेला

सुनावणीदरम्यान, पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी न्यायालयाला माहिती दिली की, आरोपींनी प्रदीप पूर्णकरांचा जीव गेल्याची खात्री होईपर्यंत त्यांच्यावर गोळीबार केला. ही बाब हत्येच्या क्रूरतेवर प्रकाश टाकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना हे हत्यार कोणी पुरवले, तसेच त्यांनी गोळीबाराचा सराव कोठे केला, या संदर्भात सखोल तपास सुरू आहे. या तपासातून मास्टरमाईंडपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी पोलिसांना आशा आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Pradeep Purnekar  | Thane Crime Case
Legislative Council Election : महायुतीकडून विधानपरिषदेच्या आणखी एका उमेदवाराची घोषणा : राष्ट्रवादीच्या वाट्याला पाचपैकी एकच मतदारसंघ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com