

Mumbai News : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने दुसऱ्यांदा आमदारकीची संधी दिली होती. मात्र, सगळे सुरळीत सुरु असतानाच त्यांनी अचानक 18 डिसेंबर 2025 ला विधान परिषद (MLC) सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा विधानभवन सचिवांकडे सोपवला आणि त्याच दिवशी मुंबईतील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सातव यांनी राजीनामा दिल्यापासून त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्तच आहे. त्यातच आता येत्या महिनाभरात विधानपरिषदेतील 9 जागा रिक्त होत आहेत. 13 मे 2026 रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 आमदार निवृत्त होत आहेत. त्यामुळे या 9 जागांसह प्रज्ञा सातव यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी दिल्यास त्या महिन्याभरात आमदार होऊ शकतात.
स्वतंत्र पोटनिवडणूक :
9 जागा या नियमित निवडल्या जाणार आहेत. तर सातव यांनी राजीनामा दिलेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक स्वतंत्रपणे घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार आहे. 288 जणांना मतदानाचे अधिकार असतील. त्यामध्ये महायुतीकडे 237 आमदार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 51 संख्याबळ आहे.
विधानसभा सदस्यातून निवडून देण्याच्या 9 जागांची मुदत 13 मे ला संपणार आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसातच या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महायुतीमधील भाजपला 5, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) वाट्याला 2 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 1 जागा येणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.