Praful Patel Video : 'आता राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नाही, कारण...', प्रफुल पटेलांनी दिली कबुली

NCP Merger Praful Patel Sharad Pawar : राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत बोलताना अनौपचारिक गप्पांमध्ये प्रफुल पेटल यांनी मोठा खुलासा करत तुर्तसा विलीनीकरण होणार नाही, असे म्हटले आहे.
Sharad Pawar Praful Patel  Ajit Pawar
Sharad Pawar Praful Patel Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Praful Patel News : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनकरणाबाबत चर्चांनी जोर धरला आहे. 12 मार्चला अजित पवार हे विलीनकरणाबाबत घोषणा करणार होते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेते सांगत आहेत. अजित पवारांच्या निधनाने सर्व राजकीय समीकरणे बदलली असून विलीकरणाचे काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी विलीनकरणाविषयी अनौपचारिक गप्पांमध्ये मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'विलीनीकरणाचा विषय अजून आमच्यापर्यंत आला नाही. तूर्तास विलीनीकरण हा विषय नाही.'

प्रफुल पटेल यांच्या या माहितीने राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरणाची चर्चा थांबली असल्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. तसेच पुढे बोलताना प्रस्ताव आला तर पाहू, असे देखील सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. हा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा केली जाईल, असे सांगितले आहे.

Sharad Pawar Praful Patel  Ajit Pawar
Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून माघार! पण मुश्रीफांचं एकच 'लक्ष्य' 'गोकुळ' दूध संघ

सुनेत्रा पवार निर्णय घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजित पवारांच्या निधनाने आम्ही दुःखात आहोत. त्यामुळे दुसरे विषय आमच्यासमोर नाहीत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व हे सुनेत्रा वहिनी करत आहेत. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतचा निर्णय त्याच घेणार आहेत.

Sharad Pawar Praful Patel  Ajit Pawar
PMC Standing Committee : पुण्यात स्थायी समितीमध्ये उपनगरातील नगरसेवकांचा बोलबाला : भाजपकडून मोठ्या धक्कातंत्राचा वापर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com