Devendra Fadnavis : धसांना धडा शिकवण्यासाठी प्राजक्ता माळी आक्रमक; घेतली थेट फडणवीसांची भेट, 'सीएम'ने दिला 'हा' मोठा शब्द

Prajakta Mali Meets CM Devendra Fadnavis : आपल्या विषयी काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात अशी तक्रारही प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यावेळी केली.
Prajakta Mali Meets CM Devendra Fadnavis
Prajakta Mali Meets CM Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आमदार सुरेश धस यांनी परळी पॅटर्न शब्द वापरून केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. तसेच धस यांची महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर प्राजक्ता हिने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. रविवारी तिने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

प्राजक्ता माळी यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यावर फडणवीस यांनी त्यांच्या (प्राजक्ता माळी) सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वास्त केले.

Prajakta Mali Meets CM Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यासह पदाधिकाऱ्यांची सीआयडीकडून आठ तास चौकशी

आपल्या विषयी काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात अशी तक्रारही प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यावेळी केली. त्यावर त्या सर्व लोकांवर सुद्धा कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

चित्रा वाघ यांच्यांकडून पाठींबा

प्राजक्ता माळी यांना भाजपमधील नेते देखील पाठींबा देत आहेत. भाजपच्या विधान परिषदेमधील आमदार चित्रा वाघ यांनी ट्विट करत 'स्त्री चा सन्मान याला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहीले आहे.त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही. या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते', असे म्हटले होते.

सुरेश धस माफी मागणार नाहीत

प्राजक्ता माळी यांनी माफी मागण्याची मागणी केली असली तरी आमदार सुरेश धस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, त्यांनी तो व्हिडिओ परत एकदा पाहावा मी काही आक्षेपार्ह बोललो नाही. मी माफीबिपी मागणार नाही. त्यांनी माझा निषेध केला. मी त्यांचा निषेध म्हणून त्या काम करत असलेला हास्य जत्रा कार्यक्रम पाहणार नाही.

Prajakta Mali Meets CM Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : 'दहा दहा बायका करा पण खून करू नका...', विजय वडेट्टीवारांचा नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com