Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांचं निकालाआधीच मोठं भाकीत; भाजपच्या मिशन ‘400 पार’ला बसणार धक्का

Political News : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी लढलेल्या 38 जागांपैकी तीन जागा जिंकणार असल्याचा विश्वास आहे. आमची मतांची टक्केवारी 2019 मध्ये मिळवलेल्या 6.75 टक्क्यांवरून वाढली आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama

Mumbai News : राज्यातील निवडणुकीची रणधुमाळी संपली असली तरी सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही बाजूनी एकमेकांवर टीका केली जात असल्याने राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नुकसान होईल, तर देशभरातील प्रादेशिक पक्ष चांगले प्रदर्शन करतील, असा अंदाज वर्तवला आहे.

2019 मध्ये कमी पडलेल्या काँग्रेसलाच (Congress) आता याचा फायदा होईल. मतदानाचे पाच टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. आणखी दोन टप्पे बाकी असल्याने आकड्यांचा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही, भाजपच्या ‘400 पार’ मिशनला मोठा फटका येत्या काळात बसणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे.

Prakash Ambedkar
Lok Sabha Election News : देशभरात भाजपला किती जागा मिळणार? अखिलेश यादव, केजरीवाल, खर्गेंनी सांगितला थेट आकडाच !

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी लढलेल्या 38 जागांपैकी तीन जागा जिंकणार असल्याचा विश्वास आहे. आमची मतांची टक्केवारी 2019 मध्ये मिळवलेल्या 6.75 टक्क्यांवरून वाढली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका मुलाखतीत पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मोदींनी या निवडणुकांचे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये रूपांतर केले, कारण प्रचार जोरदार होता.

पंतप्रधानांनी फक्त लोकसभा निवडणुकीत प्रचार केला आणि विधानसभा निवडणुकीत दोन-दोन सभा घेऊन आपली उपस्थिती दर्शवली. मोदींच्या बाबतीत त्यांनी जवळपास प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार केला. विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ते असेच करतात. प्रत्येक मतदानाला त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीचे स्वरूप दिले असल्याचे आंबडेकर यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दलित भाजपला पुन्हा पाठीशी घालणार नाहीत

भाजपच्या विरोधात मतांचे एकत्रिकरण पाहून दलित समाजातील सदस्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही हे दिसून आले. दलित भाजपला पुन्हा पाठीशी घालणार नाहीत. त्यांना आरएसएसची विचारधारा आणि हिंदु राष्ट्राची कल्पना याविषयी भीती वाटत होती. मोदींच्या विकासाच्या फळीबद्दलही त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

दहा वर्षांच्या मोदी सरकारच्या अपयशावर पांघरूण घालण्याच्या उद्देशाने ही एक धोरणात्मक चाल आहे. मी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये फिरलो आहे, जिथे मी तरुणांना बेरोजगारीचे प्रश्न सतावत आहेत. वस्तू आणि सेवा कर (GST) मुळे लघु गुंतवणूकदार आणि उद्योग संतप्त झाले आहेत, तर महागाई ही राज्यांमध्ये मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar News : 'वंचित'चा प्रभाव ओसरला... प्रकाश आंबेडकरांचा आटापिटा कशासाठी?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com