Prakash Ambedkar On Pahalgam Attack: आंबेडकरांनी 'पहलगाम'वरुन मोदी सरकारला ललकारलं; म्हणाले, '56 इंच छातीच्या...'

Pahalgam Terror Attack : केंद्र सरकारच्या माध्यमातून आता कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे. तसेच सध्या या हल्ल्यानंतर फक्त धर्म विचारून मग पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या असं जे चित्र निर्माण करून हिंदू-मुस्लिम वाद भडकवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय त्याचाही प्रकाश आंबेडकरांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
Prakash Ambedkar On Pahalgam Terroist Attack.jpg
Prakash Ambedkar On Pahalgam Terroist Attack.jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निंदा करण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यामागे हात असलेल्या पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवावा अशी मागणी सर्व स्तरातुन होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी देखील इस्राईलच्या पद्धतीने युद्ध करून पाकिस्तानचा नायनाट करावा अशी मागणी केली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर (Pahalgam Terror Attack) गोळ्या झाडण्यात आल्या, ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पार्लमेंट, पुलमावा, हैदराबाद आणि मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यावेळी सरकार ज्या पद्धतीने गाफील राहिलं त्याच पद्धतीने आता देखील सरकार गाफील राहिल्याचा पाहायला मिळालं आहे. हे टोटली इंटेलिजन्स फेल्युअर असून हे सरकारचं अपयश आहे.

ज्या पद्धतीने सरकार नक्षलवाद्यांच्या मागे लागला आहे त्या पद्धतीने आतंकवाद्यांच्या मागे का लागत नाही हा प्रश्न आहे. पुलवामासारखा अटॅक आपण केला. मात्र, पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने आतंकवादी बनवण्याच्या फॅक्टरी सुरू आहेत. त्या उध्वस्त करण्यासाठी सरकार प्लान का आखत नाही? असा सवालही उपस्थित केला.

Prakash Ambedkar On Pahalgam Terroist Attack.jpg
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांची बंदूक खेचली,अन्...! पर्यटकांच्या बचावासाठी एक काश्मिरी मुसलमान शेवटच्या श्वासापर्यंत लढला

एकदा फक्त कारवाई करून थांबण्यापेक्षा 56 इंचाची छाती असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या आतंकवादी फॅक्टऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करणं गरजेचं असल्याचं आंबेडकर म्हणाले.

केंद्र सरकारच्या माध्यमातून आता कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे. तसेच सध्या या हल्ल्यानंतर फक्त धर्म विचारून मग पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या असं जे चित्र निर्माण करून हिंदू-मुस्लिम वाद भडकवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय त्याचाही प्रकाश आंबेडकरांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

Prakash Ambedkar On Pahalgam Terroist Attack.jpg
Robert Vadra Statement : दहशतवादी हल्ल्याने देश संतापलेला असताना, रॉबर्ट वाड्रांचं वादग्रस्त विधान; म्हणाले ''देशात मुस्लिम...''

आता सरकारने ज्या पद्धतीने इस्त्राईल आपल्या दुश्मनांना उत्तर देतो त्याच पद्धतीने आता कारवाई करणे आवश्यक आहे. आतंकवाद्यांचे ट्रेनिंग बेस उडवले पाहिजेत. गरज पडल्यास युद्ध पपकारावं लागलं तरी मागे फिरू नये. पाकिस्तानशी चर्चा करून देखील युद्ध होत असेल तर समोरच्याला युद्ध करूनच संपवावा लागेल. हे सगळं थांबवायचं असेल तर युद्धाला पर्याय नाही असंही आंबेडकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com