
Pahalgam News : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना प्राण गमवावा लागला. निरपराध पर्यटकांना निर्घृणपणे संपवण्याआधी दहशतवाद्यांनी त्यांना त्यांची नावं आणि धर्म विचारल्याचं समोर येत आहे. पर्यटक हिंदू असल्याचं समजताच दहशतवाद्यांनी धाड धाड गोळ्या घातल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.पण आता याचदरम्यान,एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
सय्यद आदिल हुसेन शाह हे पहलगाम (Pahalgam Terror Attack) परिसरात घोडेस्वारीचा व्यवसाय करतात.नेहमीप्रमाणे ते मंगळवारीही तिथे व्यवसायासाठी तिथेच होते.ज्यावेळी दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पर्यटकांच्या बचाव करतानाच शाह यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांची यावेळी हल्लेखोरांशी जोराची झटापटही झाली. कारण सय्यद शाह हे दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते आणि एका दहशतवाद्याकडून त्यांनी बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर येत आहे.
तसेच काहीवेळ खेचरचालक सय्यद आदिल हुसेन शाह आणि टीआरएफ संघटनेच्या दहशतवाद्यांशी ही झटापट सुरू होती. पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी शाह यांनी जीवाची बाजी लावली.पण दहशतवाद्यांनी अखेर त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. आणि त्यातच शाह हे मृत्युमुखी पडले. अखेरच्या श्वासापर्यंत शाह यांनी ज्या पर्यटकांच्या जीवावर त्यांचा उदरनिर्वाह आहे,त्यांच्या बचावासाठी शाह हे अखेरच्या श्वासापर्यंत लढल्याची चर्चा आहे.
'एएनआय'शी बोलताना सय्यद हुसेन शाह यांचे वडील सय्यद हैदर शाह म्हणाले, 'माझा मुलगा आमच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. तो काल कामासाठी पहलगामला गेला होता आणि दुपारी 3 च्या सुमारास आम्हाला हल्ल्याची माहिती मिळाली. आम्ही त्याला फोन केला, पण त्याचा फोन बंद होता,असंही शाह यांच्या वडिलांनी सांगितलं.
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) मंगळवारी(ता.22) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या खेचर चालकाच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाले होते. 'टीआरएफ' या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील हप्तनार येथील घोडेचालक मृत सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या पीडित कुटुंबाशी संवाद साधतानाच त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या घटनेविषयी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले,सय्यद आदिल हुसेन शाह यांनाही दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात आले.कारण ते दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते आणि एका दहशतवाद्याकडून त्यांनी बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.त्याचमुळे'तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यावी लागेल आणि त्यांना मदत करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
तसेच मी सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला खात्री देण्यासाठी आलो आहे की, या कठीण काळात सरकार त्यांच्यासोबत आहे आणि मी त्यांच्यासाठी जे काही करू शकतो ते करेन, असंही मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले.
पहलगाममधील पर्यटन स्थळ असलेल्या बैसरन मैदानावर झालेल्या हल्ल्यात तेथील घोडेचालक सय्यद आदिल शाह हा एकमेव स्थानिक ठार झाला. अन्यथा हल्ल्यात ज्या लोकांचा मृत्यू झाला,त्यातील बहुतेकजण हे पर्यटक होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.