
Pune News : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सातत्याने मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आजही त्यांनी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जेसन मिलर यांची नियुक्ती कशासाठी केली, याबाबतचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पूर्वीच्या सरकारमध्ये सल्लागार राहिलेल्या जेसन मिलर यांना पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारकडून लॉबिंगसाठी नेमण्यात आले आहे, अशी माहिती पाकिस्तान मधील डॉन या वृत्तपत्राच्या बातमीतून समोर आली आहे. या नेमणुकीनुसार जेसन मिलर यांना दर महिन्याला तब्बल 1 लाख 50 हजार अमेरिकी डॉलर्स इतके मानधन देण्यात येणार आहे.
भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राला स्वतःचे परराष्ट्र खाते असताना, अशा परदेशी व्यक्तीची लॉबिंग करण्याची गरज का भासते?, असा प्रश्न उपस्थित करत आंबेडकरांनी केंद्र सरकारने याबाबत पारदर्शकता दाखवून स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही त्यांनी आवाहन केले आहे.
जेसन मिलर यांची नेमणूक मोदी सरकारच्यावतीने झाली आहे का? आणि जर झाली असेल, तर हि नियुक्ती कोणत्या कारणास्तव करण्यात आली? याची माहिती देशातील नागिरीकना देण्यात यावी, असेही आंबेडकर म्हणाले. "जेसन मिलर यांच्याकडून परवानगी आल्याशिवाय केंद्र सरकार कोणतीही कारवाई करणार नाही का?" असा गंभीर सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
भारत सरकारकडून या प्रकरणावर त्वरित आणि विश्वासार्ह उत्तर द्यावे, अशी मागणी केली आहे. जेसन मिलर हे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले आहे, असं देखील आंबेडकर म्हणाले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनमधील बातमीच्या आधारे केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.