Ambedkar meets Fadnavis: ॲड. आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; परभणी घटनेच्या संदर्भात केली महत्त्वाची मागणी

Ambedkar key demand Parbhani : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
Prakash Ambedkar and Devendra Fadnavis
Prakash Ambedkar and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Parbhani incident updates : परभणीत एका मनोरूग्णाने 10 डिसेंबरला जिल्हा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या संविधान प्रतिकृतीची विटंबना केली. त्यानंतर शहरात हिंसाचार उसळला होता. हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. यावेळी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वातावरण तापले होते.

Prakash Ambedkar and Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Case : "मुख्यमंत्रीसाहेब नंतर पश्चात्ताप होईल..."; संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

या घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेकांनी सूर्यवंशींच्या कुटुंबाला भेट दिली होती. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.

Prakash Ambedkar and Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Murder : बीडमध्ये जे काही घडलंय, त्याला धनंजय मुंडेंची कार्यपद्धती जबाबदार; स्वपक्षातील नेत्याने साधला निशाणा

ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रूपयांची भरपाई द्यावी अशीही मागणी ॲड. आंबेडकर यांनी केली. परभणीत पोलिसांनी क्रूरपणे केलेल्या मारहाणीत बळी पडलेल्यांची यादी करून त्यांना पुरेशी भरपाई देण्याची आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी रद्द करण्यासाठी सल्लामसलत करण्यासाठी, सर्वेक्षण करण्याची आमची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केली असल्याचे त्यांनी ट्विटर हँडलवरून स्पष्ट केले.

Prakash Ambedkar and Devendra Fadnavis
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख खून प्रकरणी अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप; ‘फरारी तीन आरोपींचा मर्डर..?’ (Video)

येथील घटनेच्या निषेधार्थ परभणी बंदची हाक देण्यात आली होती. त्यादरम्यान आक्रमक तरुणांनी वाहनांची, दुकानांची तोडफोड केली. घटनेच्या दोन दिवसानंतर पोलीसांनी 12 डिसेंबर रोजी सोमनाथ याच्यासह 300 लोकांना ताब्यात घेतले होते. तर 72 तासानंतर न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झाला.

Prakash Ambedkar and Devendra Fadnavis
PM Care Fund News : कोरोना महामारीनंतरही देणग्यांचा ओघ सुरूच; पीएम केअर्स फंडाला मिळाला इतका निधी

पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर सूर्यवंशीने छातीत दुखत असल्याचे सांगितल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे आणि त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तर सूर्यवंशीच्या शवविच्छेदन अहवालात अनेक जखमा झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. राज्य शासनाने या प्रकरणात सूर्यवंशीच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Prakash Ambedkar and Devendra Fadnavis
Ncp News : राज्य मंत्रिमंडळातील नाराजीनाट्य संपेना; अजितदादांच्या 'या' विश्वासू मंत्र्यांने स्वीकारला नाही पदभार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com