Prakash Ambedkar News : सरन्यायाधीश भूषण गवई हे एका कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रात आले होते. सरन्यायाधीश राज्यात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्य सचिव, पोलिस आयुक्त उपस्थित नव्हते. त्यावरून गवई यांनी आपल्या भाषणातून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. प्रोटोकॉलनुसार प्रशासकीय अधिकारी गवई यांच्या स्वागतासाठी उपस्थित नसल्याने सरकारवर देखील टीका होत आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'लोकांनी तुम्हाला चिफ जस्टिस केलंय. तुम्ही तुमच्या हिंमतीवर चिफ जस्टिस म्हणून गेलेला आहात. आता स्वतःची इभ्रत ही स्वतःच राखली पाहिजे. मी अपेक्षा धरतोय की ते बेंचवर बसल्यानंतर महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी तसेच जे कोणी आले नाहीत त्यांना ते नोटीस काढतील.'
'महाराष्ट्र शासन काय करतं काय नाय करत, हा वेगळा भाग आहे. तुम्ही चिफ जस्टीस म्हणून त्या चिफ जस्टीसच्या गादीची गरीमा ठेवणार आहात की नाही? हा खरा प्रश्न आहे. चिफ जस्टीज गवई आहे त्यांनी त्यांच्या खुर्चीची गरीमा राखून ठेवली पाहिजे.', असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.
सुप्रीम कोर्टने ओबीसींचे आरक्षण जसेच्या-तसे ठेऊन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्याव्यात, असा निर्णय दिला आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काही ठिकाणी वॉर्ड आणि काही ठिकाणी प्रभाग पद्धत आहे. शासनाने प्रभाग 3 की 4 चा ठेवणार आहेतच खुलासा करावा, प्रभाग लवकरात लवकर जाहीर करावेत. जेणेकरून उमेदवाराला आपला मतदारसंघ कोणत्या प्रभागात आहे ते कळेल, असे देखील आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीबाबत सरकारला विनंती केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार आमच्या जिल्हा कमिटीला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात भाजपला सोडून युती करण्यास हरकत नाही, त्या जिल्ह्यातील युती संदर्भातील मान्यता पक्षाची महाराष्ट्र कमिटी घेईल, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.